Advocate General of Goa Devidas Pangam Dainik Gomantak
गोवा

Information Transparency: गोमंतकीयांना हवी ती माहिती द्या, लपवू नका... महाअधिवक्त्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान!

Advocate General of Goa Devidas Pangam: जनतेला माहिती देण्यासाठी माहिती हक्क कायदा आहे. केवळ प्रतिबंधित माहिती सोडून सर्व माहिती देता येते. सार्वजनिक हितार्थ वैयक्तिक माहितीही देता येते.

Manish Jadhav

पणजी: जनतेला माहिती देण्यासाठी माहिती हक्क कायदा आहे. केवळ प्रतिबंधित माहिती सोडून सर्व माहिती देता येते. सार्वजनिक हितार्थ वैयक्तिक माहितीही देता येते. वारंवार मागितली जाणारी माहिती संकेतस्थळावरच उपलब्ध करावी अशा शब्दात राज्याचे महाअधिवक्ता ॲड. देविदास पांगम यांनी राज्य सरकारच्या विविध खात्यांतील अपिलीय अधिकाऱ्यांचे कान टोचले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याने माहिती आयोगाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या माहिती हक्क दिन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

दरम्यान, यावेळी मंचावर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त अरविंदकुमार नायर, माहिती आयुक्त आत्माराम बर्वे, माहिती संचालक दीपक बांदेकर आणि आयोगाचे सचिव सुधीर केरकर होते. ॲड पांगम म्हणाले की, ''जनतेला माहिती दिली, तर जनता अपील करणार नाही आणि आयोगाकडेही दाद मागणार नाही.

जी माहिती राज्याच्या विधानसभेला देता येते ती जनतेलाही माहिती हक्क कायद्यांतर्गत देता येते. माहिती हक्क कायद्यात कोणती माहिती देता येत नाही ते स्पष्टपणे नमूद केले आहे.'' यावेळी नायर यांनीही कायद्याचा इतिहास व विविध कलमांचा अर्थ नमूद केला.

कोकणीतून लवकरच माहिती हक्क कायदा

बर्वे म्हणाले की, माहिती हक्क कायद्याच्या कलम 26 नुसार कायदा स्थानिक भाषेत उपलब्ध केला पाहिजे. त्यानुसार लवकरच कोकणीतून माहिती हक्क कायदा उपलब्ध केला जाईल. सरकारी कार्यक्रम म्हणजे इंग्रजीचे प्रस्थ असते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोकणीतून आहे हे उत्तम. अपिलीय अधिकाऱ्यांनी माहिती अधिकाऱ्यांना माहिती देण्याचा आदेश दिल्यानंतर त्याचे पालन होते की नाही पाहणारी यंत्रणा निर्माण करायला हवी. म्हणजे आयोगाकडे दाद मागणे कमी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT