Advocate General of Goa Devidas Pangam Dainik Gomantak
गोवा

Goa Advocate General: बेकायदेशीर कामांमध्ये गोमंतकीयांचाही हात, असं का म्हणाले अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम?

Arpora Fire Case Reaction: जे लोक कायद्याचे पालन करीत नाहीत, कायद्यावर विश्वास ठेवत नाहीत, तेच लोक बेकायदेशीर कृतीमध्ये असतात. केवळ पैसा कमावणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट असते.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: जे लोक कायद्याचे पालन करीत नाहीत, कायद्यावर विश्वास ठेवत नाहीत, तेच लोक बेकायदेशीर कृतीमध्ये असतात. केवळ पैसा कमावणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट असते. आमचे लोक सुद्धा त्यांना मदत करतात, अशी प्रतिक्रिया गोव्याचे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी हडफडेतील आग घटनेवर व्यक्त केली. ही घटना कायद्यावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनी निर्माण केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आले, तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. गोमंतकीयांनी आपल्या जमिनीबद्दल प्रेम बाळगणे महत्त्वाचे आहे. इतरांना आपल्या जमिनीवर बेकायदेशीर कामे करण्यापासून रोखले पाहिजे, असे ते म्हणाले.

पंचायतींना सल्ला

काही पंचायती बांधकामे मोडण्याचा आदेश देतात, पण कायद्याचा अभ्यास करीत नसतात, त्यामुळे न्यायालय काहीही करू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंचायतींनी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळली तर पुढील बेकायदेशीर कृत्ये रोखता येतात हे त्यांनी स्पष्ट केले. लुथरा बंधूंना जामीन मिळू नये म्हणून आम्ही जोरदार युक्तिवाद केला. जामिनाला विरोध केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला, असेही त्यांनी सांगितले.

लुथरा बंधूंना अटकपूर्व जामीन नाकारला

दुसरीकडे, फरार संशयित सौरभ व गौरव लुथरा या बंधूंनी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात ट्रॉन्झिट अँटिसिपेटरी बेल (अटकपूर्व जामीन) याचिका दाखल करून चार आठवड्यांचे अटकपूर्व संरक्षण तसेच देशात परतल्यानंतर तातडीने अटक होऊ नये अशी मागणी केली होती. या याचिकेला गोवा (Goa) सरकारने विरोध करताना म्‍हटले होते की, लुथरा बंधूंनी जाणीवपूर्वक चौकशीपासून पळ काढला. त्यामुळे संशयितांना अंतरिम संरक्षण देऊ नये. ती मान्य करत न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार'चं रौद्ररुप! वन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत बैलाचा बळी, दावणीला बांधलेल्या बैलाला हत्तीने चिरडले

प्रँक राजकारण! गोंयकारांना फसवल्याचा सरदेसाई - परबांचा एकमेकांवर आरोप Watch Videos

अग्रलेख- समाजाच्या संवेदनांची हत्या..! क्लब मालक, अधिकारी अन् नियंत्रण यंत्रणांच्या कुचराईत 25 निष्पाप जिवांनी गमावला जीव

दारु प्यायली, फ्रिजमधील खाद्यपदार्थ खाल्ले अन् पैसे, सोन्याचे दागिने चोरुन पसार झाले; पाजीफोंड येथे 9 लाखांची चोरी

पर्यटन हवयं, मृत्यूचा नंगानाच नको! गोव्यातील क्लब, पब्जसाठी ठोस कायद्याची गरज; 'करमणुकीचा कार्यक्रम' ही पळवाट बंद करा- संपादकीय

SCROLL FOR NEXT