taxi.jpg 
गोवा

Goa Taxi: विमान तिकिटापेक्षाही टॅक्सी भाडे महाग  

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील टॅक्सीचालक (Motor Cab) पर्यटक तसेच स्थानिकांकडून भरमसाट भाडे आकारतात. हे भाडेदर अनेकदा विमानांच्या तिकिटापेक्षाही (Plane tickets) अधिक असतात. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रकारच्या टॅक्सींना डिजिटल मीटर्सची (Digital Meter) सक्ती केली गेली आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणीवेळी केला. गोवा खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ही याचिका दाखल करून घेत त्यावरील सुनावणी वेगाने घेण्याचे नमूद केले आहे. (Advocate General Devidas Pangam argued before the Goa bench that taxi drivers in Goa are charging higher fares.)

केळळी टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सॅनफोर्ड बार्रेटो व इतरांनी गोवा खंडपीठात याचिका सादर करून मोटार वाहन कायदा नियम 140 ला आव्हान दिले आहे. मोटर कॅब तसेच कॉन्ट्रॅक्ट कॅरिजिस ही टॅक्सीपासून वेगळी असून एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ती प्रवाशांना घेऊन जातात. वाहतूक खात्याने या वाहनांचा टॅक्सी परवाना संपला आहे त्यांना डिजिटल मीटर्स बसविल्यानंतरच नूतनीकरण केले जाईल अथवा परवाना रद्दबातल होईल, अशा नोटिसा बजावल्या आहेत. 

... तर निर्बंध घातल्यासारखे होईल! 
मोटार वाहन कायदा नियम 140 ला अंतरिम स्थगिती देणे म्हणजे नियमांच्या अंमलबजावणीस सरकारवर निर्बंध लादण्यासारखे होईल. हे प्रकरण घटनेशी संबंधित असल्याने जोपर्यंत सरकारचा निर्णय अनियंत्रित असल्याची ठोस माहिती दिली जात नाही तोपर्यंत प्राथमिक सुनावणीवेळी अंतरिम स्थगिती देता येत नाही, असे निरीक्षण गोवा खंडपीठाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT