Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News : पोर्तुगीज कायद्याचे ॲड. मनोहर उसगावकरांचे ज्ञानरुपी तेज पसरलेय सर्वदूर

न्यायमूर्ती महेश सोनक : कायदा शिकविणारे, अनेकांचे भवितव्य घडविणारे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आम्‍ही गमावले

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : ॲड. मनोहर शेणवी उसगावकर यांच्या ज्ञानरुपी तेजाने आम्हाला कायद्याबाबत सजग बनविले. त्यांनी आपले ज्ञान इतरांना दिले. वारसा दिला. अनेकांचे भवितव्य घडविले. ते नीतीमान आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी वाटचाल केली. विनोद प्रचुरताही त्यांच्यात होती.

कूळ-मुंडकार कायद्याच्या बाजूने ते वावरले. त्यांच्या स्मृती अखंड जपल्या जातील, अशा शब्दांत न्यायमूर्ती महेश सोनक यांनी माजी ॲडव्होकेट जनरल तथा कायदेपंडित ॲड. उसगावकर यांना आज बुधवारी श्रद्धांजली अर्पण केली. येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेच्‍या सभागृहात झालेल्या शोकसभेत न्यायमूर्ती सोनक बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला ॲडव्होकेट जनरल ॲड. देविदास पांगम, माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, ज्येष्ठ वकील अवधूत सलत्री, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब उपस्थित होते. ॲड. देविदास पांगम यांनीही विचार मांडले.

जीवनकार्य अविस्मरणीय

पोर्तुगीज कायदे इंग्रजीत भाषांतर करण्यात ॲड. मनोहर उसगावकर यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. या भाषांतराचा लाभ इतर राज्यांतील न्यायालयांनाही झाला. समान नागरी कायदा त्यांना अभिप्रेत होता. त्यांचे एकूणच जीवनकार्य कायम स्मरणात राहील. गोमंतकीयांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

माझे गुरू ॲड. मनोहर उसगावकर यांनी कायदा विश्वाला वेगळे वळण दिले. वकिलांनी कसे असावे, कसे वागावे याचा वस्तुपाठच त्‍यांनी घालून दिला. आज देश न्यायिक संघर्षातून जात आहे. अशावेळी त्यांच्यासारख्‍या दीपस्तंभाची, मार्गदर्शकाची उणीव भासते. कायदे करत असताना, त्यांची अंमलबजावणी करत असताना, त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचा त्यांनी नेहमीच विचार केला. ते नेहमीच विनयशील राहिले.

ॲड. रमाकांत खलप, माजी केंद्रीय कायदामंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

SCROLL FOR NEXT