Goa Monsoon 2023: गोव्यात रेड अलर्ट, आपत्कालीन काळात उत्तर - दक्षिण जिल्ह्यातील नागरिकांसाठी संपर्क क्रमांक जाहीर

राज्यात बुधवारी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असून सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023: गोवा हवामान खात्याने आज (गुरुवारी) राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण खात्याने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे. राज्‍यातील महाविद्यालयांनाही सुटी असेल.

राज्यात बुधवारी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असून सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

दक्षिण गुजरात ते उत्तर केरळच्या किनाऱ्यापर्यंत समुद्र सपाटीजवळ ऑफ-शोअर ट्रफ तयार झाला आहे. त्यातच उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्याला लागून उत्तर आणि मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोव्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर झाला आहे.

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

येथे साधा संपर्क

राज्य नियंत्रण कक्ष 08322419550 | उत्तर गोवा 08322225383 आणि दक्षिण गोवा 08322794100 या नंबरवर संपर्क साधता येईल.

Goa Monsoon 2023
Goa Monsoon Update 2023: रेड अलर्ट जारी; 9 जुलैपर्यंत मुसळधार बरसणार, आज शैक्षणिक संस्थांना सुटी

उत्तर गोव्यासाठी जाहीर केलेले संपर्क क्रमांक

तिसवाडी - 0832 - 2225383, 0832-2426578, सत्तरी - 0832-2374090, 826205199, डिचोली 0832-2362237, 8799937644, पेडणे 9067910323, बार्देश 8055665335

दरम्यान, हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 09 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी राज्यात ''रेड अलर्ट'' जाहीर केला होता. मात्र, गुरुवारीही हवामान खात्याचे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com