Advice of Power Department to take appropriate measures by Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

..तर ‘सोनसोडो’ची वीज तोडणार

मडगाव नगरपालिकेने योग्‍य उपाययोजना करण्‍याचा वीज खात्‍याचा सल्ला

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव नगरपालिकेच्या सोनसोडो कचरा यार्डात गेल्‍या शुक्रवारी लागलेल्या आगीच्‍या दुर्घटनेनंतर वीज खात्याने आता कडक भूमिका घेताना तेथे आवश्यक ती उपाययोजना न केल्‍यास वीजपुरवठा तोडण्याचा इशारा दिला आहे. पालिकेने या घटनेला वीज खात्‍याला जबाबदार धरले होते. पण वीज खात्‍याने याबाबत पालिकाच (Municipality) उदासीन असल्‍याचा आरोप केला होता.

वीज (Power) खात्याचे साहाय्यक अभियंता कार्लोस फर्नांडिस यांनी यासंदर्भात पालिकेला एक पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी 33 केव्ही वीजवाहिनींखालील कचऱ्याच्‍या राशी त्वरित हटविण्याची सूचना केली आहे. तसेच सदर वाहिन्यांच्या जवळपासही अशा प्रकारे कचरा टाकला जाणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. त्याकडे दुर्लक्ष झाले तर कचरा प्लांटला होणारा वीजपुरवठा तोडणे भाग पडेल, असा इशाराही या पत्राद्वारे देण्‍यात आला असून आपत्कालीन स्थितीत उपयुक्त अग्निशमन यंत्रणा तसेच सिलिंडर तयार ठेवणे असे उपायही त्यांनी सुचविले आहेत.

आग दुर्घटनेला पालिकाच कारणीभूत

सोनसोडो (sonsodo) येथील 33 केव्ही दाबाच्या वीजवाहिन्या तेथून स्थलांतरित करण्याच्या मडगाव नगरपालिकेच्या मागणीवर बोलताना फर्नांडिस म्हणाले की, त्यासाठी नगरपालिकेला 15 टक्के पर्यवेक्षण शुल्क चुकते करावे लागेल. तसेच परवानाधारक वीज ठेकेदाराला 33 केव्ही भूमिगत केबल टाकण्याचे काम द्यावे लागेल. डिसेंबर 2019 मध्ये खात्याने मडगाव पालिकेला पत्र पाठवून उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखाली कचरा (Garbage) टाकू नये अशी विनंती केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच पुन्हा ही दुर्घटना घडली असे सांगून त्यांनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा इन्कार केला. पहिल्‍यांदा कचऱ्याला आग लागली व त्‍यामुळे कंडक्टर वितळून गेला, असा दावाही त्‍यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT