advantage of playing with Penya; Opinion of Ceritan Fernandes
advantage of playing with Penya; Opinion of Ceritan Fernandes Dainik Gomantak
गोवा

पेनया यांच्यासमवेत खेळल्याचा फायदाच! सेरिटन फर्नांडिस यांचे मत

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवाचे आताचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया खेळाडू असताना त्यांच्यासोबत खेळलो आहे. त्याचा फायदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना निश्चितच होईल, असा विश्वास एफसी गोवाचा अनुभवी बचावपटू सेरिटन फर्नांडिस याने व्यक्त केला. याचवेळी संघाचा युवा मध्यरक्षक प्रिन्सटन रिबेलो याने आगामी आयएसएल स्पर्धेत पहिल्या चार संघात स्थान मिळवून विजेतेपदही पटकावण्याचा आशावाद व्यक्त केला.

(advantage of playing with Penya; Opinion of Ceritan Fernandes)

सेरिटन व प्रिन्सटन यांनी आभासी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. एफसी गोवाने या दोघांना आणखी दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. 2022-23 हा सेरिटनचा एफसी गोवा जर्सीत सहावा, तर प्रिन्सटनचा चौथा मोसम असेल.

पेनया प्रेरित करणारे व्यक्तिमत्त्व

सेरिटन म्हणाला, ‘‘यापूर्वी मी पेनया यांच्यासमवेत मैदानावर खेळलो आहे. मैदानावर खेळाडू या नात्याने नेहमीच सहकाऱ्यांना प्रेरित करण्यावर पेनया यांचा भर असायचा. वैयक्तिक पातळीवर त्यांनी मला खूप उत्तेजन आणि प्रोत्साहन दिले. त्या अनुभवाचा लाभ आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना निश्चितच होईल. त्यांना आयएसएल स्पर्धेचा ढाचा चांगलाच माहीत आहे, त्याचा फायदा संघालाही होईल,’’ आयएसएल करंडक जिंकण्याचे ध्येय आहे. त्यासाठी मेहनत घेत समर्पित वृत्तीने खेळण्यावर, तसेच गोल आणि अधिक असिस्ट नोंदविण्यावर भर राहील, असे 29 वर्षीय सेरिटन याने सांगितले. गतमोसमात आघाडीफळीत धारदार खेळ करणारा आणि गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंची उणीव एफसी गोवास भासली, असे निरीक्षणही त्याने व्यक्त केले.

प्रिन्सटनसाठी एफसी गोवा कुटुंब

‘एफसी गोवा संघ व्यवस्थापन माझ्यासाठी कुटुंब आहे. या संघासाठी, तसेच चाहते आणि गोमंतकीयांसाठी आयएसएल जिंकण्याचे माझे स्वप्न आहे. त्यामुळेच नव्याने करार करताना माझ्या मनात दुसरा विचार आला नाही,’’ असे प्रिन्सटन म्हणाला. बचावात्मक बाबींत आणखी प्रगती साधत आगामी मोसमात प्रत्येक सामना खेळण्याचे ध्येय बाळगल्याचे 23 वर्षीय मध्यरक्षकाने नमूद केले. गतमोसमाचा अपवाद वगळता, त्यापूर्वी आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा संघ नियमित पहिल्या चार संघात असायचा. गतवेळी आमची नवव्या क्रमांकावर घसरण झाली याचे दुःख होते. त्यातून योग्य धडा घेतला असून आता स्पर्धेतील उत्कृष्ट बनायचे असल्याचे प्रिन्सटनने ठासून सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT