Goa Mining, Advalpal Mining Dainik Gomantak
गोवा

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

Advalpal Mining Goa: खाण मंत्रालयात खटला गेल्‍यानंतर तेथून तो सरकारकडे आला आणि त्‍याच्‍या सुनावण्‍या पणजी उपजिल्‍हाधिकाऱ्यांसमोर काही काळ चालल्‍या.

Sameer Panditrao

पणजी: खाण लीजमध्‍ये जमिनी असलेल्‍या मालकांच्‍या हातावर तुटपुंजी रक्कम ठेवून स्‍वत: मात्र कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या ‘फोमेंतो रिसोर्सिस’ या कंपनीला अडवलपालमधील चंद्रकांत सरप या जमीनमालकाने चांगलेच धारेवर धरले आहे. यासंदर्भातील खटल्‍यांना भक्‍कमपणे लढा देत, आमच्‍या जमिनी घेऊन तुम्‍ही करोडो कमावता, मग आम्‍हाला का नागवता? असा संतप्‍त सवालही त्‍यांनी फोमेंतोसह इतर खाण कंपन्‍यांना विचारला आहे.

याबाबत चंद्रकांत सरप यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, त्‍यांची अडवलपालमध्‍ये १५ हजार चौरस मीटर मालकी हक्काची जमीन आहे. ही जमीन खाण लीजमध्‍ये येत असल्‍याने सर्वप्रथम २०१६ मध्‍ये लितो फेर्रांव या नावाने त्‍यांना या जमिनीच्‍या ‘सरफेस राईट’साठी नोटीस आली. पण, पडद्यामागे फोमेंतो कंपनी होती.

त्‍यावेळी आपण जमीन देण्‍यास नकार दिल्‍याने लितो फेर्रांव यांनी नियमानुसार खाण मंत्रालयात धाव घेतली. खाण मंत्रालयात हा खटला गेल्‍यानंतर तेथून तो सरकारकडे आला आणि त्‍याच्‍या सुनावण्‍या पणजी उपजिल्‍हाधिकाऱ्यांसमोर काही काळ चालल्‍या. त्‍यावेळी फोमेंतोने जमिनीसाठी प्रतिचौरस मीटर नऊ रुपयेप्रमाणे दर देण्‍याचा हट्ट धरला होता. आपण मात्र या दराला कायम विरोध दर्शवला. तेथील काही सुनावण्‍यांनंतर फोमेंतोच्‍या प्रतिनिधींनी सुनावण्‍यांना उपस्‍थिती लावण्‍याचे बंद केले. त्‍यामुळे पणजी उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी हा खटला निकाली काढला, असे ते म्‍हणाले.

डिसेंबर २०२४ मध्‍ये पुन्‍हा त्‍यांना जमिनीच्‍या ‘सरफेस राईट’बाबतची नोटीस आली. ही नोटीस मात्र फोमेंतोच्‍या नावे होती. यावेळी या नोटिशीसंदर्भातील खटला सध्‍या उत्तर गोवा अतिरिक्त जिल्‍हाधिकारी–१ यांच्‍यासमोर सुरू आहे. तेथे सध्‍या सुनावण्‍या सुरू असून, मागील सुनावणीवेळी उत्तर गोवा अतिरिक्त जिल्‍हाधिकाऱ्यांनी विभागीय कृषी अधिकाऱ्यांना आपल्‍या जमिनीचा सर्व्हे करून अहवाल सादर करण्‍याचे निर्देश जारी केले आहेत, असे त्‍यांनी सांगितले.

अडवलपालमधील आपली जमीन मालकी हक्‍काची जमीन आहे. जिल्‍हाधिकारी अवघ्‍या नऊ रुपये दराने जमीन फोमेंतोस देण्‍यास सांगत आहेत. परंतु, आपल्‍याला हा दर अजिबात मान्‍य नाही. जमीन संपादन कायदा, २०१३ नुसार आपल्‍याला दर मिळावा, ही आपली मागणी आहे. तसे झाल्‍यास आपल्‍याला जमिनीचा योग्‍य भाव मिळेल, असेही सरप यांनी सांगितले.

सरप यांनी हायकोर्टातही घेतली होती धाव

फोमेंतो कंपनीच्‍या नोटिशीनंतर चंद्रकांत सरप यांनी उच्च न्‍यायालयातही धाव घेतली होती. परंतु, खाणींसंदर्भातील जमीन संपादनाच्‍या मोबदल्‍याची प्रकरणे प्रथम खाण मंत्रालयाच्‍या कोर्टात चालत असल्‍यामुळे या प्रकरणाची सुनावणी खाण मंत्रालयामार्फतच होईल. तेथील निकालानंतर संबंधितांना उच्च न्‍यायालयात दाद मागता येईल, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केल्‍यामुळे हे प्रकरण खाण मंत्रालयात आले, अशी माहिती चंद्रकांत सरप यांचे वकील ॲड. शेरविन कोरिया यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT