Goa Mines Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Issues: आमची घरे-मंदिरे वाचवा! डिचोलीतील 'खाण'प्रश्नांवरून ग्रामस्थ चलबिचल; आंदोलनाचा इशारा

Mining Dispute Goa: डिचोली तालुक्‍यातील खाण पट्ट्यांमध्‍ये गेलेली घरे व मंदिरे वगळण्‍यासाठी सरकारकडून हालचाल होत नसल्‍याने नागरिकांत चलबिचल वाढली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mining Zone Dispute In Bicholim

डिचोली: डिचोली तालुक्‍यातील खाण पट्ट्यांमध्‍ये गेलेली घरे व मंदिरे वगळण्‍यासाठी सरकारकडून हालचाल होत नसल्‍याने नागरिकांत चलबिचल वाढली आहे. खाणी सुरू होण्‍यापूर्वी सरकारने दिलेली अभिवचने न पाळल्‍यास जोरदार आंदोलन छेडण्‍याचे ग्रामस्‍थांतून घाटत आहे.

शिरगाव येथील श्री लईराई मंदिर हे साळगावकर खाण कंपनीच्‍या अखत्‍यारीत येत आहे. जनसुनावणीवेळी ग्रामस्‍थांनी मंदिर व घरे वगळावीत, अशी मागणी केली होती. त्‍याला सरकारकडून दुजोरा देण्‍यात आला होता.

खाणी सुरू व्‍हाव्‍यात अशा मानसिकतेमधून लोकांनी फारसा विरोध केला नाही. परंतु लोकांची घरेदारे जाणार असतील, तर आम्‍ही गप्‍प बसणार नाही, असा इशारा देण्‍यात येत आहे. मुळगावात वेदांता कंपनीशी ग्रामस्‍थांचा संघर्ष होत आहे; तर अडवलपालवासीयांनी फोमेन्‍तो कंपनीविरोधात एकजूट केली आहे. कंपन्‍यांनी ग्रामस्‍थांना गृहीत धरू नये, असा इशाराही देण्‍यात आला आहे.

मोलेतून विनापरवाना वाहतूक केली बंद

सुकतळी - मोले येथे बुधवारपासून सुरू केलेली खनिज वाहतूक वन खात्याने बंद केली आहे. आवश्‍‍यक परवाना न घेतल्‍याने ही कारवाई करण्‍यात आली. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य गेटला कुलूप लावले आहे.

अडवलपालवासीयांचा मूक मोर्चा

१. मंदिरांसह आमची घरेदारे वाचवा, अशी मागणी करून अडवलपालवासीयांनी आज मूकमोर्चा काढून पंचायतीवर धडक दिली. यावेळी तेथे उपस्थित पंच सदस्य शेखर परवार यांच्याकडे त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

२.शिरसई-अडवलपाल खाण ब्लॉक-५ अंतर्गत येणारी अडवलपालमधील कोळमवाड्याला लागून असलेली ‘फोमेंतो रिसोर्सिस’ कंपनीची खाण सुरू झाली आहे. मंदिरांसह घरेदारे खाण लीज क्षेत्रातून बाहेर काढण्याच्यादृष्टीने अद्याप कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत.

३. ग्रामस्थांनी पंचायतीवर धडक दिली, त्यावेळी तेथे गीतेश गडेकर आणि गजानन पालकर हे पंच सदस्य उपस्थित होते. लोकांनी दिलेले निवेदन खाण आणि भूगर्भ खात्याकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन पंच सदस्य शेखर परवार यांनी यावेळी दिले.

४. खाण लीजमधून मंदिरांसह घरेदारे बाहेर काढण्याकडे दुर्लक्ष झाले, तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. वेळप्रसंगी आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा अडवलपालमधील नागरिकांनी दिला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस जारी केल्यामुळे कोळमवाड्यावरील नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Surya Gochar 2026: शनिच्या नक्षत्रात सूर्याचे आगमन; 18 मार्चपासून 'या' 3 राशींचे नशिब सोन्यासारखे चमकणार

SCROLL FOR NEXT