Uday Bhembre  Dainik Gomantak
गोवा

Uday Bhembre : ज्येष्ठ साहित्यिक उदय भेंब्रे यांना मानाचा चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार असलेले स्व. केणी यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात कोंकणी भाषा आणि गोवा राज्य या दोन गोष्टींच्या उत्कर्षासाठी काम केले.

सुशांत कुंकळयेकर

Uday Bhembre : ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ॲड. उदय भेंब्रे यांना यंदाचा स्व. चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्व. केणी यांच्या 88 व्या जयंती निमित्त मडगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार भेंब्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार असलेले स्व. केणी यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात कोंकणी भाषा आणि गोवा राज्य या दोन गोष्टींच्या उत्कर्षासाठी काम केले. त्यांचेच हे कार्य पुढे नेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मडगाव नगरपालिका सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हा मानाचा पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती आणि फोमेंतो उद्योग समूहाचे अध्यक्ष अवधूत तिंबले यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे.

ॲड. उदय भेंब्रे यांनी जनमत कौल आंदोलनात स्व. केणी आणि अन्य सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते. ज्यामुळे गोव्याचे विलीनीकरण न होता त्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिले होते. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT