Goa School Dainik Gomantak
गोवा

Goa School: सहा वर्षे पूर्ण असतील, तरच पहिलीत प्रवेश

Goa School: केंद्राची सूचना : गोव्यात मात्र 2026-27 पासून अंमलबजावणी : आज शिक्षण सचिवांशी चर्चा

दैनिक गोमन्तक

Goa School: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) सहा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना येत्या 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे सूचित केले आहे.

मात्र, गोवा राज्याच्या शैक्षणिक कायद्यानुसार 2026-27 पासून केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशांचे पालन करावे लागेल. अन्यथा अनेक मुलांचे एक वर्ष वाया जाईल, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव अर्चना शर्मा अवस्थी यांनी हे परिपत्रक सर्व राज्ये व केंद्रशासित राज्यांना जारी केले आहे. शिक्षण खात्याने मागील काही वर्षांपूर्वी सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले होते.

या परिपत्रकाला पालकवर्गाने आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने पालक वर्गाला दिलासा दिला होता. त्यामुळे पहिलीत प्रवेश देण्याबाबत राज्याचा कायदा कायम राहिला आहे.

आज शिक्षण सचिवांशी चर्चा

राज्यात कायदा बदल न झाल्यास तसेच केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार वयाच्या अटीचे पालन करून प्रवेश द्यायचा झाल्यास 2026-27 पासून त्याची अंमलबजावणी करणे शक्य असल्याचे झिंगडे यांनी नमूद केले. उद्या, सोमवारी शिक्षण सचिवांशी परिपत्रकाविषयी चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

...तर कायद्यात बदल गरजेचा

नव्या शैक्षणिक धोरणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे; परंतु गोव्यातील शैक्षणिक कायद्यानुसार साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जातो.

केंद्र सरकारच्या सहा वर्षांच्या अटीचे पालन करायचे झाल्यास त्याचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो. जर या नियमाचे पालन करायचे झाल्यास गोवा सरकारला आपल्या कायद्यात बदल करावा लागेल, असे झिंगडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT