Mapusa Municipality: म्हापसा पालिकेच्या नवीन प्रशासकीय ब्लॉक प्रकल्पाचे काम सुमारे दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. सध्या पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, पालिका कार्यालयासमोर हा प्रकल्प उभा राहत असला तरीही या कामाला गती मिळत नाही.
या प्रशासकीय ब्लॉकची पायाभरणी डिसेंबर 2021 मध्ये आमदार जोशुआ डिसोझा व पालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांच्या हस्ते 2.97 कोटी रुपये खर्चून करण्यात केलेले. मात्र, दोन वर्षे उलटूनही अद्याप पहिल्या मजल्याचेच बांधकाम चालू आहे.
पालिकेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, कारण सध्याच्या इमारतीमध्ये जागेचा अभाव असल्याने लोकांचीच नाही, तर कर्मचाऱ्यांचीही खूप गैरसोय होते. जागेअभावी खिडकीच्या भागांत, कॉरिडॉरमध्ये आणि मिळेल तिथे फाईल्स ठेवल्या जात असल्याने येथील जागेची कमतरता प्रकर्षाने जाणवते.
याशिवाय, सध्या पालिका लहान सभागृह मंडळाच्या बैठकीसाठी वापरते, मात्र तिथेही जागेची कमतरता आहे. या जागेच्या अडचणींवर मात करण्यासाठी 2017 मध्ये म्हापसा पालिका मंडळाने सुसज्ज बैठकीचा सभागृह व अधिक जागा असावी, यासाठी या नवीन प्रशासकीय ब्लॉक प्रस्तावित केला होता. त्यानुसार, पालिकेने पार्किंगची योग्य सुविधा असलेली तीन मजली इमारत प्रस्तावित केली. या प्रकल्पात तळघर पार्किंगची सुविधा व पहिल्या मजल्यावर दुकाने व कार्यालयांसह कॅन्टीनची सोय केली आहे.
पहिल्या मजल्यावर दुकाने व कार्यालये असतील, जी महसूल मिळवण्यासाठी भाड्याने दिली जातील व दुसऱ्या मजल्यावर एक कम्युनिटी हॉल असेल. ज्याचा वापर पालिका मंडळ बैठका घेण्यासाठी केला जाईल. कारण, विद्यमान इमारतीत सध्याचा सभागृह तुलनेने लहान व पालिका मंडळाच्या बैठकीत गर्दी होते.
या प्रकल्पाबाबत बोलताना नगरसेवक अॅड. शंशाक नार्वेकर म्हणाले, प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी सत्ताधारी मंडळ अग्रेसर आहे, मात्र प्रकल्प मार्गी लागत नाहीत. नेहमीप्रमाणे कार्यक्रम आयोजिले जातात व लोकांना मूर्ख बनवले जाते, की काही तरी प्रकल्प मार्गी लागेल. अशावेळी म्हापसेकरांवर डोळे उघडण्याची वेळ आली आहे.
तांत्रिक अडचणी दूर करणे आवश्यक
ब्लॉक बांधकामाचे काम उपकंत्राटदाराकडून केले जात आहे. कारण वास्तविक कंत्राटदाराने त्याला काम दिले आहे. तथापि सुरुवातीला स्लॅबच्या कामातील काही तांत्रिक अडचणी दुरुस्त करणे आवश्यक असल्याने उशीर झाला आणि त्यानंतर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कारण, बांधकामाच्या ठिकाणी क्वचितच कामगार दिसताहेत, असे पालिकासूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.