Goa Dairy Dainik gomanatk
गोवा

गोवा डेअरीचे कर्मचारी उद्यापासून संपावर?

डेअरीच्या एका कर्मचारी संघटनेने संपावर जाण्याचा निर्धार केला आहे, तर दुसऱ्या कर्मचारी संघटनेने याबाबत कोणताच निर्णय न घेतल्याने या संपाचे होणार काय

दैनिक गोमन्तक

फोंडा : गोवा डेअरीच्या (Goa Dairy) कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्धार पक्का केला असून आज (सोमवारी) काय ते स्पष्टपणे सांगा, असे निर्वाणीचे सांगूनही डेअरी प्रशासनाकडून (Administration) कोणतीच प्रतिक्रिया आली नसल्याने बुधवारी 8 ते शुक्रवारी 10 असे तीन दिवस संपावर जाण्याचा निर्धार डेअरी कर्मचारी संघटनेने केला आहे.

डेअरीच्या एका कर्मचारी संघटनेने संपावर जाण्याचा निर्धार केला आहे, तर दुसऱ्या कर्मचारी संघटनेने याबाबत कोणताच निर्णय न घेतल्याने या संपाचे होणार काय, असाही सवाल उपस्थित होत आहे. तरीही संप रोखण्यासाठी उद्या मंगळवारचा एक दिवस डेअरी व्यवस्थापनाच्या हाती आहे.

मागण्‍या मान्‍य होणार का?

गोवा डेअरीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच डिएरनेस अलावन्स लागू करणे या दोन मागण्यांसाठी संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. या दोन्ही मागण्या मान्य करण्‍यासाठी 6 तारखेपर्यंत मुदत दिली होती. मात्र, व्यवस्थापनाने काहीच सांगितले नसल्याने संपाशिवाय पर्याय नाही, असे कामगारांनी म्हटले आहे.

...तर संपाचा निर्णय रद्द

कर्मचारी संघटनेचे नेते अजीतसिंह राणे यांनी आज (सोमवारी) बैठक घेऊन संपाबाबत मार्गदर्शन केले आहे. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य केल्या, तर संपाचा निर्णय रद्द करू अन्यथा मागण्यांसाठी संपाशिवाय पर्याय नाही, असे मत अजीतसिंह राणे यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT