New agriculture scheme: डेअरी योजनेसाठी अर्ज करा आणि मिळवा 90% अनुदान

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत राज्यात शएतकऱ्यांसाठी नवीन योजना चालवल्या जात आहेत.
New agriculture scheme for Dairy business
New agriculture scheme for Dairy businessDainik Gomantak
Published on
Updated on

दुग्ध व्यवसायातून उत्पन्न वाढवू इच्छिणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांसाठी एक चांगली बातमी (latest agriculture scheme) आहे. हरियाणामध्ये (Haryana) 50 पशुसंख्या असलेल्या शेतकऱ्यांना डेअरी उभारण्याच्या खर्चामध्ये 25 टक्के सूट दिली जात आहे. हरियाणा सरकारने (Haryana Government)म्हटले आहे की, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय (Dairy business) विभागामार्फत राज्यात दुधाची दरडोई उपलब्धता वाढवण्याच्या आणि दुग्ध व्यवसायातून बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने, दूध आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित अनेक नवीन योजना चालवल्या जात आहेत.

New agriculture scheme for Dairy business
काय आहे Post Office Scheme? ज्यामुळे मिळणार दरमहा 3300 रूपये पेन्शन

एका अधिकृत प्रवक्त्याने आज सांगितले की, विभागाने हाय-टेक मिनी डेअरी योजनेअंतर्गत सामान्य श्रेणीतील पशुपालक 4, 10, 20 आणि 50 दुभत्या जनावरांसाठी डेअरी उभारू शकतात. 4 आणि 10 दुभत्या जनावरांची (म्हैस, गाय) डेअरी उभारणाऱ्या व्यक्तींना विभागाकडून 25 टक्के अनुदान दिले जाईल. तसेच 20 आणि 50 दुभत्या जनावरांच्या दुग्धशाळेवर व्याज अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

कोणाला मिळणार 90 % सबसिडी

या योजनेअंतर्गत, 2/3 दुभत्या जनावरांची डेअरी उभारण्यासाठी आणि त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या व्यक्तींसाठी डुकरांच्या संगोपनासाठी 50 टक्के अनुदान दिले जाईल. त्यांनी सांगितले की मेंढ्या किंवा बकऱ्यांची डेअरी सुरू करणाऱ्या लोकांना 90 टक्के अनुदान दिले जाईल. या योजनांमुळे दुधाचे उत्पादन वाढेल.

New agriculture scheme for Dairy business
Post Office ने पैसे काढण्याबाबतचे बदलले नियम, हे जाणून घ्या

यासाठी काय करावे लागेल

दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणीच्या वेळी, कुटुंब ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रद्द चेक आणि बँकेची एनओसी अपलोड करावी लागेल. विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही दिवशी विभागाच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com