Rama Kankonkar Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Goa Police Chargesheet Filed: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात उत्तर गोवा पोलिसांनी मोठी आणि जलद कारवाई केली.

Manish Jadhav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात उत्तर गोवा पोलिसांनी मोठी आणि जलद कारवाई केली. याप्रकरणी तब्बल 1371 पानांचे विस्तृत दोषारोपपत्र तयार करुन ते उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

दोषारोपपत्रातील महत्त्वाचे पुरावे

पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात कोणतीही कसर सोडली नसल्याचे दोषारोपपत्राच्या विस्तारावरुन दिसून येते. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये तपास अधिकाऱ्यांनी एकूण 49 साक्षीदारांचे जबाब या दोषारोपपत्रात नोंदवले आहेत. यातून हल्ल्याच्या घटनेचा आणि त्यामागील कट-कारस्थानाचा संपूर्ण क्रम उलगडण्यास मदत होणार आहे. गुन्ह्याशी संबंधित म्हणून पोलिसांनी जप्त केलेला आणि आवश्यक पुरावा असलेले 32 मुद्देमाल देखील दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर करण्यात आले. यामध्ये गुन्ह्यात वापरलेली हत्यारे किंवा इलेक्ट्रॉनिक पुरावे समाविष्ट असण्याची शक्यता आहे.

आठही आरोपी न्यायालयीन कोठडीत

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपींना अटक केली. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आता या आठही आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही निश्चित झाली. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. काणकोणकर यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे गोव्याच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठे पडसाद उमटले. नागरिकांनी या गुन्ह्याचा तीव्र निषेध करुन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करुन हे विस्तृत दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या निकालाकडे सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT