Goa Traffic Rules Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Rules: वाहतूक नियमोल्लंघनाबाबत कारवाई

Goa Traffic Rules: आगामी नाताळ व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी पोलिसांनी रात्रीच्यावेळी वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Traffic Rules: आगामी नाताळ व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी पोलिसांनी रात्रीच्यावेळी वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. काल पहिल्याच दिवशी नियम मोडणाऱ्या 35 चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मद्यधुंद वाहन चालकांसह सीट बेल्ट व हेल्मेट न घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम नववर्षापर्यंत सुरूच राहणार आहे अशी माहिती पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिली.

पर्वरी पोलिसांनी काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री मध्यरात्रीपर्यंत पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन चालकांची तपासणी सुरू केली. यावेळी मद्यधुंद, सीट बेल्ट व हेल्मेट न वापरणे, डिझलिंग लाईट, भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या वचक व शिस्त यावी, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात येणार असल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे शिस्तीने व नियमांचे पालन करून वाहने चालवावीत यासाठी ही मोहीम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT