Action recorded against 145 drunk drivers in five days in goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News: अल्कोमीटरअभावी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ कमकुवत

पोलिसांपुढे आव्हान : गेल्या पाच दिवसांत 145 तळीरामांवर कारवाईची नोंद

दैनिक गोमन्तक

पणजी: वेगमर्यादा व मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकांविरुद्ध ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोहीम सुरू केली असली तरी अल्कोमीटरअभावी ती कमकुवत ठरताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांत 145 मद्यपी वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून न्यायालयात अहवाल पाठवला आहे.

(Action recorded against 145 drunk drivers in five days in goa)

पहिला गुन्हा असेल त्यांना दंडात्मक कारवाईनंतर परवाना निलंबित न करता एकदा संधी दिली जाईल मात्र दुसऱ्यांदा सापडल्यास थेट वाहन परवानाच रद्द करण्यासाठी शिफारस केली जाईल, असे मत वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

अल्कोमीटरची कमतरता असल्यामुळे जिल्हा पोलिस स्थानके या कारवाईत उतरत नाहीत. 50 टक्क्यांहून अधिक अल्कोमीटर नादुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे नव्या 45 अल्कोमीटरचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी अधिकृत कंपनीकडून खरेदी करण्याची प्रक्रिया बाकी आहे.

10 हजारांचा दंड; 3 महिन्यांचा कारावास

वाहतूक पोलिसांनी रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत मद्य प्राशन केलेल्या वाहन चालकांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी उत्तर गोव्यात 17 तर दक्षिणेत 14 प्रकरणांची नोंद झाली. पोलिस रात्रीच्यावेळी मद्यप्राशन चाचणी करत असल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतला आहे कारण गुन्ह्यासाठी तब्बल दहा हजार रुपये दंड व 3 महिन्यांचा कारावास अशी शिक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT