sarpanch Sonia Pednekar Dainik gomantak
गोवा

Porvorim News : सुकूर पंचायतीची कृती कायदेशीरच : सरपंच सोनिया पेडणेकर

म्हणून ८ ऑगस्ट रोजी घर पाडण्यासंबंधीची नोटीस दिली

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim News : पर्वरी,पर्वरी येथील २० कलमी वसाहतीतील एक बेकायदा घर पाडण्याची कारवाई ही कायद्यानुसारच होती, असे स्पष्ट करून सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणकेर यांनी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी विनाकारण त्याचे राजकारण केल्याचे आज पर्वरीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.

शोभना हरमलकर या असहाय्य विधवा महिलेने पंचायतीकडे नीलेश चारी यांच्या घराबाबत २७ एप्रिल रोजी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्वेक्षण करून पंचायतीने २७ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

मात्र, त्या नोटीशीला चारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून ८ ऑगस्ट रोजी घर पाडण्यासंबंधीची नोटीस दिली. त्या नोटिशीला चारी यांनी अतिरिक्त पंचायत संचालकाकडे आव्हान दिले

त्या तक्रारीवर कैक सुनावण्या झाल्यानंतर पंचायत संचालकांनी चारी यांचे घर बेकायदा ठरवून पंचायतीने दिलेला आदेश हा योग्य असल्याचे स्पष्ट करून पंचायतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. हा आदेश पंचायत संचालनालयाकडून १८ ऑक्टोबर रोजी जारी झाला आहे.

‘त्या’ आदेशाची प्रत चारी यांच्या वकीलांनी स्वतः स्वाक्षरी करून घेतली आहे. त्यामुळे त्यांना संचालकांच्या आदेशाला हवे असल्यास आव्हान देता आले असते.

त्यांनी काही आव्हान दिले नव्हते. त्यामुळे संचालकांचा आदेश अंमलात आणणे, हे पंचायतीचे कर्तव्य होते. म्हणून पंचायतीचे पथक कारवाईसाठी २६ ऑक्टोबर रोजी तेथे गेले होते.

मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथे गोंधळ घालून बेकायदा गोष्टींना समर्थन देण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसची ही कृती नेहमीचीच असून त्यात फार काही नवे नाही, असे पेडणेकर म्हणाल्या. कॉंग्रेसच्या बेकायदा गोष्टींना समर्थन देण्याच्या प्रयत्नामुळेच राज्यातून व केंद्रातूनही कॉंग्रेस सत्ताभ्रष्ट झाल्याची आठवणही पेडणेकर यांनी यावेळी करून दिली.

चारी यांनी अगोदर त्यांच्या शेजारी असलेल्या तक्रारदार शोभना हरमलकर या असहाय्य महिलेच्या घराविरोधात तक्रार केली होती. त्यामुळे त्या महिलेनेही चारी यांच्या घराविरूध्द तक्रार दिली होती.

पंचायत संचालकांनी सुनावण्या घेतल्यानंतरच चारी यांचे घर बेकायदा ठरवून ते पाडण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश सुकूर पंचायतीने दिलेला नाही तर पंचायतीचे पथक तो आदेश अंमलात आणण्याच्या कारवाईसाठी गेले होते, असे पेडणेकर यांनी सांगितले.

आमचे सरकार हे गरिबांच्या हिताआड नाही. आजवर या सरकारने गरिबांचे हित सांभाळले आहेय निज गोंयकार, भूमिपुत्र यांची कशी कदर करायची, हे सरकारला सांगायला कॉंग्रेसच्या चमच्यांची गरज नाही.

बेकायदा गोष्टी करणाऱ्यांची पाठराखण करून कॉंग्रेसची कृती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे.

-किशोर अस्नोडकर, भाजप मंडळ अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT