Swachh Bharat Mission Dainik Gomantak
गोवा

Swachh Bharat Mission: गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य न केल्यास कारवाई- गुदिन्हो

पंचायत क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान आणखी गंभीरपणे घेणार

गोमन्तक डिजिटल टीम

Swachh Bharat Mission गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी ज्यांचा आम्हाला सहयोग मिळत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा न करता कारवाई करू. पंचायत क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान आणखी गंभीरपणे घेणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

यासाठी ज्या पंचायतींचे सहकार्य नसेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिला. बोगमाळो येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या 'स्वच्छ सुजल शक्ती सन्मान' कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, चिकोळणा- बोगमाळो सरपंच जगन्नाथ महाले,चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव,गोवा पंचायत महिलाशक्ती अभियानच्या अध्यक्षा दीक्षा कानोळकर, पंचायत सचिव मिनीनो डिसोझा , साकवाळ जिल्हा पंचायत सदस्या अनिता थोरात, पंचायत संचालक सिद्धी हळणकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला राज्यातील 191 पंचायतींपैकी अनेक पंचायतींचे सरपंच, पंचायत सचिव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मागील काळात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ज्या पंचायतींनी उत्तम कार्य केलेले आहे त्या पंचायतीच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

पुढे बोलताना पंचायत मंत्री गुदिन्हो म्हणाले की गोव्याच्या बहुतेक पंचायत क्षेत्रात "एमआरएफ" शेड उभारून कचरा वेगळा करून नंतर त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. मात्र, अजूनही काही पंचायत क्षेत्रात कचरा गोळा केला जात नाही. तसेच त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नाही.

मात्र, आता स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी ते 'मिशन' म्हणून राबविणार आहोत.तसेच राज्यातील अनेक पंचायतीत घरपट्टीसह विविध भाडे मिळून तब्बल 50 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

पंचायतीनी आता याकडे गंभीरपणे पाहून ही थकबाकी वसूल करावी. त्यासाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे. केवळ सरकारकडून मिळणाऱ्या निधीची प्रतीक्षा करत राहू नका असा सल्लाही मंत्री गुदिन्हो यांनी दिला.

गोव्यात आता 'स्वच्छ भारत अभियान' दुसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचले आहे. अनेक पंचायतींनी एमआरएफ शेड उभारून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मात्र, अजूनही काही पंचायतींचे कचरा गोळा करण्याचे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम होत नाही.

अभियान गोव्याच्या पंचायत क्षेत्रात त्यामुळे आम्ही आता स्वच्छ भारत मिशन पद्धतीने पुढे नेण्याचे ठरविले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी ज्यांचा आम्हाला सहयोग मिळणार नाही त्यांना आम्ही घरी पाठविणार आहोत, असा इशारा गुदिन्हो यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT