Goa Latest News Dainik Gomantak
गोवा

Bicholim शहरात अडथळा कराल, तर खबरदार..!

‘त्या’ पदेरांना हटवले : डिचोली पालिकेची कारवाई; अपघात टाळण्याचे प्रयत्न

दैनिक गोमन्तक

शहरात रहदारीस अडथळा कराल, तर खबरदार..! अशी कडक तंबी देत, डिचोली पालिकेने अखेर ‘त्या’ पदेरांना तेथून हटवले. शहरात गर्दीच्या ठिकाणी उभे राहून पावविक्री करणाऱ्या आणि रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या ‘पदेरां’वर कारवाई करणार असे संकेत पालिकेने आठ दिवसांपूर्वीच दिले होते. गेल्या 27 ऑगस्ट रोजीच्या दै. ‘गोमन्तक’मधून तत्संबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

शहरात सध्या ‘पदेरां’ची संख्या वाढली आहे. सायकल किंवा मोटारसायकलवर पाटे लावून हे ‘पदेर’ रोज सकाळ-संध्याकाळ बाजार परिसर मिळून शहरातील विविध ठिकाणी पावविक्री करताना आढळून येतात.

शहरात पदेरांची संख्या वाढत असली आणि विविध ठिकाणी पदेर आपला व्यवसाय करीत असले, तरी शहरातील न्यायालय इमारतीजवळून बाजारात जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर उभे राहून पावविक्री करणाऱ्या काही पदेरांमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. या पदेरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असे.

बहुतेकजण तर मध्येच वाहने उभी करून पाव खरेदी करीत होते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता.

‘पदेरां’चा मोर्चा आता सुरक्षित ठिकाणी

रस्त्यावर व विशेषतः वळणाच्या ठिकाणी थांबून पाव विक्री करणाऱ्या पदेरांमुळे यापूर्वी लहान-सहान अपघात घडले होते. हा धोका ओळखून पालिकेने रस्त्यावरील विक्रेत्यांना कारवाईची कडक ताकीद देऊन तेथून हटवले आहे. यामुळे या विक्रेत्यांनी आता सुरक्षित ठिकाणी आपला मोर्चा वळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT