Water Sports in Goa Dainik Gomantak
गोवा

Water Sport: ‘वॉटर स्पोर्ट्‌स बोट’मध्ये जादा प्रवाशांना नेणाऱ्यांवर कारवाई

याप्रकरणी हार्बर कोस्टल सिक्युरिटी पोलिसांनी तिघांना अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Water Sports in Goa: बायणा समुद्रात ‘वॉटर स्पोर्ट्‌स बोट’ नौकेत जादा प्रवाशांना घेऊन नौकेतील सर्वांचा जीव धोक्यात घालण्याचे कृत्य केल्याप्रकरणी हार्बर कोस्टल सिक्युरिटी पोलिसांनी तिघांना अटक केली.

त्या नौकेत (बोट) अधिकच्या 15 प्रवाशांना घेऊन बायणा समुद्रात गेल्याचे कळताच पोलिसांनी ही कारवाई केली.

हार्बर कोस्टल पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिस हवालदार रवींद्र धुरी यांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.

शुक्रवारी दुपारी 12.50 च्या सुमारास प्रकाश शंकर राठोड (रा. बार्देश), कुशल मदलापूर (वय 22, रा. कांदोळी) आणि हनुमन्ता लमाणी (35, रा. कांदेळी) नामक संशयित एम. व्ही श्री रेणुका 1 नौकेतून (बोट) जादा प्रवाशांना घेऊन ''बेट आयलॅण्ड'' समोरील समुद्रात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तपासणी केली असता, त्या नौकेतून 60 प्रवाशांना समुद्रात नेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; युरीला जोर का धक्का

Tiswadi: तिसवाडीत दिवसभर पाणीबाणी! ओपा जलवाहिनीत बिघाड; रात्रभर दुरुस्ती काम

Goa Crime: जुळ्या बहिणींवर लैंगिक अत्याचार, साडेचार वर्षीय मुलींनी दिली साक्ष; 39 वर्षीय तरुणाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Amit Shah: अमित शहांच्या हस्ते 2451 कोटींच्या विकासकामांची होणार सुरुवात! मुखर्जी स्टेडियमवर 10 हजार लोक जमणार; वाहतूक मार्गात मोठे बदल

Arvind Kejriwal: 2027 मध्ये गोव्यात 'आम आदमी'चे सरकार; केजरीवालांना आत्मविश्वास, काँग्रेसवर भाजपला मदत केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT