Gas Cylinder  Dainik Gomantak
गोवा

Gas Cylinder: अवैध सिलिंडरविरोधात कारवाई

वास्को येथे नागरी पुरवठा विभागाने 10 हॉटेल्सवर छापा टाकत घरगुती वापराचे 7 सिलिंडर जप्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर आणि कमी वजनाच्या सिलिंडरविरोधात आज दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी प्रशासनाने कारवाई केली. वास्को येथे नागरी पुरवठा विभागाने 10 हॉटेल्सवर छापा टाकत घरगुती वापराचे 7 सिलिंडर जप्त केले. तर वजन व माप खात्याने लोटली व काणकोण येथे सहा कमी वजनाचे सिलिंडर जप्त केले.

घरगुती ग्राहकांना बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी मुरगाव नागरी पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यावर विभागाने चौकशी केली. त्यात अनेक हॉटेल व्यावसायिक सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वाहनांवरील कामगारांना हाताशी धरून घरगुती सिलिंडर हॉटेलमध्ये वापरत असल्याचे आढळून आले.

त्या अनुषंगाने आज नागरी पुरवठा अधिकाऱ्यांनी वास्को शहरात 10 हॉटेल्सवर कारवाई केली. तेथून 7 घरगुती सिलिंडर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

ग्राहकांनी केल्या होत्या तक्रारी

वजन व माप खात्याच्या कारवाईत काणकोणमध्ये ४ कमी वजनाचे सिलिंडर आढळले. तर लोटलीत दोन कमी वजनाचे सिलिंडर आढळून एजन्सीच्या आवारात उघड्यावर टाकलेले सिलिंडर सापडले. केपे व सांगे येथेही अशाच प्रकारची कारवाई झाली. दोषी एजन्सींविरोधात गॅस कंपन्यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT