Puppy Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: माणुसकीला काळीमा फासणारी घटना; कुंडईत कुत्र्याच्या पिल्लांना विष घालून मारलं

Goa Crime News: अन्नाच्या शोधात आलेल्या दोन कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप.

Pramod Yadav

कुंडई: उत्तर गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना विष घालून मारल्याचा क्रूर प्रकार उघडकीस आला आहे. कुंडईत ही घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी प्राण्यांविरोधी क्रूरता प्रतिबंधक जिल्हा सोसायटीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुदीन कामत यांच्यावतीने याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. फेसबुकवर याबाबत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. कुंडईत चार पैकी दोन लहान कुत्र्यांना विष देऊन जीवे मारण्यात आले आहे. अन्नाच्या शोधात आलेल्या दोन कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आले. एका इमारतीतील लोकांनी हे काम केल्याचा आरोप सुदीन यांनी या पोस्टमधून केला आहे.

चार महिन्यांची ही लहान पिल्ले इमारतीच्या परिसरात अन्नाच्या शोधात येत होते. यांच्यापासून कोणालाच धोका नव्हता पण, इमारतीतील काहींना याचा त्रास होत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी लहान पिल्लांचे पाय तोडण्याची देखील धमकी दिल्याचा आरोप कामत यांनी केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT