Panaji Municipality Dainik Gomantak
गोवा

Panaji Municipality: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, गोंधळ, शाब्दिक वाद! महानगरपालिकेची सभा गाजली

महापौर, आयुक्त धारेवर : विविध विषयांवरून शाब्दिक वाद रंगले

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Municipality महानगरपालिकेची शुक्रवारी (ता.19) झालेली सभा विशेष गाजली ती आरोप-प्रत्यारोपांमुळे. महापालिकेच्या मार्केट परिसरात विक्रेत्यांकडून गोळा केल्या जाणाऱ्या सोपो करातील घोटाळा आणि पे-पार्किंग कंत्राटदाराला आयुक्तांनी दिलेल्या पत्रात मुदतवाढीच्या शिफारशीच्या नोटमध्ये नगरसेवकाचे आलेले नाव या दोन्ही बाबींवर जोरदार गोंधळ दिसून आला.

विनापरवाना सोपो कर गोळा होत असल्याचा प्रकार सभेपूर्वीच उघड झाल्याने ही सभा वादळी होणार हे स्पष्ट होते आणि झालीही तशीच.

या घोटाळ्यातील पाळेमुळे खोदण्यासाठी आयुक्तांनी समिती नेमली आहे, असे असतानाही एवढ्या मोठ्या घोटाळ्यासंबंधीत सध्याच्या सुपरवायझरला आता बोलवा आणि काय तो घोटाळा उघड होईल, अशी अपेक्षा नगरसेवकांनी करणे कितपत योग्य आहे हे त्यांनीच तपासणे आवश्‍यक आहे.

नेहमीप्रमाणे सुरवातीला आक्षेप नोंदविणारे मुद्दे टंकलिखित करून आणणारे सुरेंद्र फुर्तादो यांनी स्वीकृत नगरसेवक किशोर शास्त्री यांच्यावर टीका केली. शास्त्री म्हणे फुर्तादोंच्या प्रभागात लुडबूड करतात. शास्त्री हे काही निवडून आलेले नसल्यामुळे त्यांची लुडबूड फुर्तादोंना कशीबरे पचनी पडेल.

तसे पाहिले तर इतर नगरसेवकांच्याही प्रभागात म्हणे त्यांची लुडबूड सुरू असते, त्याचे दाखलेही अनेकांनी दिले. आता त्यावेळी शास्त्री यांची अनुपस्थिती होती म्हणून बरे अन्यथा पहिल्यांदाच शाब्दिक वाद झाला असता.

शास्त्री आले; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. फुर्तादो काही मुद्दे मांडत असताना अधूनमधून महानगरपालिकेच्या दुरुस्ती कायद्यांचे काय झाले, असा सवाल महापौरांना विचारत होतेच.

महापालिकेच्या मार्केट इमारतीतील दुकानांचा भाडेकरार होण्याचा पायपोस नाही, असे असताना दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा होत असलेला प्रकार उदय मडकईकरांनी सर्वांसमोर व्हिडिओच्या माध्यमातून आणला.

पहाटेपासून मार्केट परिसरात खुल्या जागेवर आणि मासळी मार्केटच्या दोन्ही बाजूस रस्त्याच्या बाजूने बसणाऱ्या विक्रेत्यांकडून सोपो कर गोळा केला जातो. परंतु त्या पैशांपोटी विक्रेत्यांना पावती दिली जात नसल्याचा प्रकार गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असणे, रुचणारच नाही.

खरेतर या घोटाळ्याच्या माध्यमातून मडकईकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे दायित्व आयुक्त आणि महापौरांचे होते. पण त्यांनी ते दाखविले नाही.

विशेष बाब म्हणजे बाजार समितीचे चेअरमन बेंटो लॉरेन यांनी हा वाद आपल्या अंगावर घेतला. त्यामुळे विरोधातील मडकईकर, फुर्तादो, ज्योएल आंद्रादे आणि नेल्सन काब्राल यांनी लॉरेन यांच्यावर तुटून पडण्याची संधी सोडली नाही.

मडकईकरांचा राग अनावर

उदय मडकईकरांनी आपण कोणत्याही चौकशीस तयार असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा मास्टरमाइंड शोधण्यासाठीच तीन सदस्यीय समिती नेमल्याचे आयुक्तांनी जाहीर केल्यानंतर मडईकरांचा पारा उतरला.

तर याचदरम्यान सुपरवायझरला बोलावून घ्या आणि सत्य काय ते त्याला विचारा, असा काही नगरसेवकांनी मुद्दा मांडला. पण त्याला मंजुरी मिळाली नाही. मडकईकरांना वादाचा आणखी एक मुद्दा मिळाला, तो पे-पार्किंगच्या कंत्राटदाराला मुदतवाढीच्या प्रस्तावामध्ये आपल्या नावाचा वापर कसा झाला.

आपण शिफारस न करताच तेथे नाव कसे आले? या मुद्यावरून आपण तुम्हाला निलंबित करू? असे मडकईकरांनी सांगितले. आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी आपला राग व्यक्त केला.

काब्राल-फुर्तादो भिडले

मार्केट करार आणि दुरुस्तीच्या खर्चाच्या विषयावर चर्चा झाली व सोपो कराचा विषय आला तेव्हा प्रभाग 1चे नेल्सन काब्राल व फुर्तादो यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. फुर्तादो यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या अनुभवाचा दाखला यावेळी देत खाली बसणे पसंत केले. तर उलट काब्राल यांनी आपण मांडत असलेला आणि फुर्तादो बोलत असलेला मुद्दा एकच असल्याचे दिसून आल्यानंतर माघार घेतली.

‘त्या‘ प्रकरणाची आठवण

पाटोवरील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयांनी व्यापलेला रस्ता आता अरुंद झाला आहे. याप्रकरणी कोणी नगरसेवकाने पाच लाख रुपये घेतल्याचे प्रकरण चर्चेत आले होते, त्यामुळे आता तरी कार्यालये हटवा, असे शुभम चोडणकर यांनी सांगत ‘त्या‘ प्रकरणाची आठवण करून दिली. काही खर्चाच्या विषयांना मंजुरी देण्याचे काम मात्र इमानेइतबारे बसून नगरसेवकांनी केले, हे काही कमी नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT