Ponda News: शेती अवजारे, मातीची भांडी, गृहोपयोगी वस्तूंनी ‘कृषी महोत्सव’ गजबजला!

तालुकास्तरावर प्रथमच भव्य आयोजन : शेतकऱ्यांसह दर्शकांची मोठी उपस्थिती
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News फोंड्यातील कृषी महोत्सव कमालाचा यशस्वी ठरला. शुक्रवारी (ता.१९) या कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन झाल्यानंतर शनिवारी (ता.२०) शेतकरी आणि लोकांची तोबा गर्दी या कृषी महोत्सवाला उसळली होती.

शेतीविषयक अनेक फळे, झाडे तसेच शेतकऱ्यांसाठीची अवजारे, मातीची भांडी, गृहोपयोगी वस्तू व इतर साहित्याचे स्टॉल्स या कृषी महोत्सवात थाटण्यात आल्याने शेतकरी आणि इतर लोकांनी ते पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

रविवारी या कृषी महोत्सवाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. सुट्टी असल्याने आणखी गर्दी होईल, अशी अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी उपयुक्त साहित्य तसेच अन्य वस्तूंमुळे हे कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरले. उद्‌घाटनावेळी शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली होती.

केवळ प्रदर्शनच नव्हे तर शेतीलागवडीसाठी उपयुक्त माहितीही शेतकऱ्यांना तज्ज्ञांमार्फत देण्यात आली, त्यामुळे माहितीपूर्ण असा खजिनाच शेतकऱ्यांना या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाला. विशेष म्हणजे काही मनोरंजनात्मक कार्यक्रमही साकारण्यात आले.

या कृषी महोत्सवात कृषीविषयक अवजारे तसेच इतर साहित्य आणि कृषी उत्पादनांची भरपूर रेलचेल आहे. शेतकरी व इतर लोकांकडून प्रदर्शनासाठी गर्दी होत असून याबाबत त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता दिसून आली.

Ponda News
Panaji Municipal Corporation: पणजीतील ‘सोपो’ घोटाळ्याची चौकशी करा

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

राज्यातील एखाद्या तालुक्यात अशाप्रकारचे कृषी महोत्सव आणि प्रदर्शन भव्यरीत्या आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एरव्ही राजधानी किंवा अन्य शहरात अशा महोत्सवांचे आयोजन केले जाते;

ज्या फोंडा तालुक्यात शेतकरी आणि बागायतदार आहेत, तेथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कृषी महोत्सव आणि प्रदर्शन आयोजित करण्यामुळे शेतकऱ्यांना ते उपयुक्तच ठरले.

Ponda News
घटस्फोटित एअर होस्टेस टार्गेट, करोडोंची फसवणूक; शिक्षण MBA, दुबई रिटर्न 'रिकी बहल'ला गोव्यात अटक

राज्यात कृषी धन वाढावे, गोवा राज्य कृषी धनाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनावे, हाच हेतू कृषी खात्याने ठेवला आहे. आतापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी, बागायतदारांसाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवले आणि यापुढेही राबवण्यात येतील.

कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक माहिती उपलब्ध व्हावी तसेच शेती अवजारे आणि इतर धान्ये, फळे, झाडे उपलब्ध व्हावी यासाठी तजवीज करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसादही आनंददायी आहे.

- रवी नाईक, कृषिमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com