michael lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: हा कदाचित 'त्यांचा' मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो! लोबोंवर प्रदेश काँग्रेसचे आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Press Conference

पणजी: कळंगुट मतदारसंघात गुन्हेगारी वाढलेली आहे. अंमलपदार्थ विक्री व्यवहार, वेश्‍या व्यवसाय वाढला आहे त्याकडे आमदार मायकल लोबो यांचे लक्ष नाही. त्यामुळेच लोबोंसह इतर दोन फुटीर आमदार पोलिसांकडे जाऊन गुन्हेगारी वाढल्याची भाषा करीत आहेत. मंत्रिमंडळ फेरबदल होणार असल्याने सरकारविरोधात बोलले, तर मंत्रिपद मिळवण्याचा त्यांचा कदाचित प्रयत्न असू शकतो, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केला आहे.

काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, सांताक्रूझ गट समिती अध्यक्ष जॉन नाझारेथ, तसेच जीना परेरा व रोनाल्डो रुझारिओ यांची उपस्थिती होती.

पर्यटकांना वाहतूक नियंत्रक पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाविषयी आमदार मायकल लोबो यांनी नुकतीच आमदार डिलायला लोबो व आमदार केदार नाईक यांच्यासह पोलिस महासंचालकांची भेट घेत भाजप सरकारला घरचा अहेर दिला होता. लोबो यांनी केलेल्या या कृतीवर भिके यांनी वरील मत व्यक्त केले आहे.

भिके पुढे म्हणाले, भाजप सरकारच्या बारा वर्षांच्या काळात कोणाला फायदा झाला असेल, तर तो भाजपच्या मंत्र्यांना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना झाला आहे. जाहीर केलेल्या नोकऱ्या देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.

त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदांच्या भरतीमध्ये घोटाळा झाला नसेल, तर ज्यांना नोकरीवर घेतले आहे, त्यांचे परीक्षेचे पेपर दाखवावेत, असे आपले या सरकारला आव्हान आहे. भाजपच्या नेत्यांनी युवकांना नोकऱ्यांपाठी प्रयत्न केले नाहीत, पण त्यांनी मालमत्ता जमा करण्यात अधिक लक्ष घातल्याचे दिसत आहे.

आपण मुख्यमंत्री असतो तर!

राज्यात अपघात वाढले आहेत, पूर्वी काही आठवड्यांनी अपघात घडायचे आता दररोज अपघात घडत आहेत. प्रत्येक तालुक्यात शंभर वाहतूक नियंत्रण पोलिस आहेत, ते कुठेच दिसत नाहीत. ते योग्यरितीने काम करीत नाहीत, त्यामुळे अपघात वाढले आहेत. वाहने वाढली आहेत आणि आमची मुले स्मार्ट आहेत. पण आपण वेगाने वाहने चालवा असे म्हणणार नाही. मात्र, आपण मुख्यमंत्री असतो तर सोळा वर्षांच्या मुलांना वाहन चालवण्याचे परवाने दिले असते. युरोपात सोळा वर्षांच्या मुलांना वाहन चालविण्याचे परवाने दिले जातात. वाहने ही गरज बनली आहे, परंतु सोळा वर्षांच्या मुलांना परवाने देताना काही निर्बंध घालणे आवश्‍यक आहेत. अमुक वेग आणि अमुक क्षेत्रातच वाहन चालविणे आवश्‍यक आहे, असा नियम करावा. कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी होते का, वाहतूक पोलिसांचे चलन वाढले की त्यांचे हप्ते वाढतात, असा आरोपही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Driving Licence: गोव्यात 18 ऐवजी 16व्या वर्षीच लायसन्स दिले असते, काँग्रेस नेत्याचे विधान; परदेशात वयोमर्यादा काय?

Calangute News: लवकरच कळंगुटमध्ये होणार प्रशस्त कॉम्प्लेक्स आणि बसस्थानक; टाटा ट्रेन्सच्या साहाय्याने पंचायतीचा पुढाकार

..आता कडक कारवाईच! कचरा फेकणाऱ्यांचा फोटो काढून पोलिसांत तक्रार द्या; गोवा सरकार स्वच्छतेसाठी ॲक्शन मोडवर

मडगाव ऐतिहासिक घटनेला १३४ वर्षे पूर्ण! शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

'गोवा होलसेल विक्रीस काढलाय का'? मेगा प्रोजेक्ट, डोंगर कापणी, भू-रुपांतरावरुन वाढता जनआक्राेश

SCROLL FOR NEXT