Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: ध्वजारोहणावरून काँग्रेसचा भाजपवर जोरदार पलटवार!

Goa BJP: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेस भवनाखाली शुक्रवारी 75 वा प्रजासत्ताकदिन साजरा केला आणि देशाचा राष्ट्रध्वज फडकवला.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेस भवनाखाली शुक्रवारी 75 वा प्रजासत्ताकदिन साजरा केला आणि देशाचा राष्ट्रध्वज फडकवला. त्‍यानंतर, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजप कार्यालयात तिरंगा फडकावतानाचे फोटो प्रसिद्ध करावेत असे आव्हान काँग्रेसचे सोशल मीडिया समन्वयक ग्लेन लॅसेर्डा यांनी दिले.

भाजपच्या सोशल मीडिया हँडल्सवरून काँग्रेस पक्षाच्या ध्वज लावलेल्या खांबाबरोबर खाली तिरंग्याचा ध्वजस्तंभ उभारल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर टीका केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गांधी कुटुंबावर टीका करत भाजपचे ट्विट रि-पोस्ट केले होते. त्याला लॅसेर्डा यांनी आव्हान दिले आहे.

तिरंग्याचा ध्वजस्तंभ काँग्रेस पक्षाच्या ध्वजाच्या खाली एका रेषेत दिसत आहे व ही अनावधानाने घडलेली चूक आहे. त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तिरंगा खाली खेचल्यावर भाजपने ट्विट केले होते का, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. अमित शहा तिरंग्यावर नव्हे तर

भगव्या झेंड्यावर विश्वास ठेवतात का? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख दिव्यकुमार यांनी उपस्‍थित केला आहे.

काँग्रेस कार्यालयाच्‍या पहिल्या मजल्यासमोर पक्षाचा झेंडा खूप दिवसांपासून लावण्यात आला आहे. तो ध्वज काही २६ जानेवारी रोजी फडकावला नव्‍हता. काँग्रेस पक्ष देशाचा राष्ट्रीय ध्वज फडकावतो आणि दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, गोवा मुक्तिदिन काँग्रेस मुख्यालय तसेच दोन्ही जिल्हा कार्यालयांमध्ये अभिमानाने साजरे करतो. पण भाजपचे काय?
- अमरनाथ पणजीकर, काँग्रेसचे माध्यमप्रमुख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT