According to a national survey tourists would like to visit Goa  Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांची पहिली पसंत गोवाच

कोविड महामारीच्या (Covid-19) काळात बंद पडलेला राज्यातील (Goa) पर्यटन व्यवसाय (Tourist Business) उभारी घेईल काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड महामारीच्या (Covid-19) काळात बंद पडलेला राज्यातील (Goa) पर्यटन व्यवसाय (Tourist Business) उभारी घेईल काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खाण उद्योग सुरू होणार की नाही याची शाश्‍वती नसल्याने रोजगारासाठी केवळ पर्यटन क्षेत्रच शिल्लक राहिल्याची सार्वत्रिक भावना आहे. या वातावरणात दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षणात कोविडोत्तर काळात गोव्‍याला भेट देणे आवडेल असे अनेक पर्यटकांनी नमूद केले आहे.

थॉमस कुक या पर्यटन व्यवसाय करणाऱ्या बड्या कंपनीने यासाठीचे सर्वेक्षण केले आहे. त्यात लेह लडाख, काश्मीर, हिमाचल, केरळ, अंदमानसह गोव्याला पर्यटनस्थळ म्हणून अनेकांनी पसंती दिली आहे. या संस्थेचे भारतातील प्रमुख राजीव काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. सरकार टाळेबंदी, संचारबंदी, प्रवासावरील निर्बंध कधी मागे घेत आहे याची त्यांना प्रतीक्षा आहे. कोविड महामारीमुळे देशातील पर्यटकांनी विदेशांऐवजी देशी पर्यटनस्थळांनाच पसंती दिल्याचे आमच्या सर्वेक्षणात आढळले आहे.

त्यांनी नमूद केले की, या पर्यटकांपैकी 65 टक्के जणांना गोव्याला भेट द्यायची आहे. त्यांना प्रवास रद्द केला तरी कोणतेही शुल्क कापले जाऊ नये, वेळापत्रकात सोयीने बदल करण्याची सुविधाही हवी आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 15 टक्के पर्यटक निर्बंध मागे घेतल्यावर लगेच प्रवासास निघण्याच्या तयारीत आहेत. 50 टक्के जणांनी पुढील 3-6 महिन्यात सहल काढू असे म्हटले आहे.

गोव्यात केलेल्या सर्वेक्षणातून दुबई, रशिया, मॉरीशस आणि मालदीव येथे जाणे आवडेल असे नमूद करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अमेरीका, ब्रिटन, कॅनडा येथे व्यावसायिक कारणास्तव जाऊ इच्छीणाऱ्यांची संख्याही गोव्यात बऱ्यापैकी असल्याचे काळे यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT