Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: अपघातांचे खापर लोकांवर फोडल्यावरून विरोधकांची सरकारवर टीका

माविन म्हणतात, ‘ब्लॅक स्पॉट’ हटविणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident News चालक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. रस्त्यांवरील खड्डे, ओबडधोबड रस्ते हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, तर सरकारच्या उदासीन धोरणांमुळे अपघातसत्र सुरू असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राज्यातील अपघातांबाबत लोकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. तसेच बेशिस्त चालकांमुळेच अपघात होत असल्याचे सांगितले. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. ‘बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात होतात, असे वक्तव्य करून सरकार जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे.

वाहतूक विभाग व पोलिस भ्रष्टाचारात गुंतल्यानेच चालकांवर कारवाई होत नाही. वाहतूक नियमांचे योग्य फलक नाहीत. खड्डे, ओबडधोबड रस्ते हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे, असे आलेमाव म्हणाले.

अपघातांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. राज्यातील ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखले जात असून संरेखन करून अनेक ब्लॅक स्पॉट काढले आहेत. सुरक्षा समितीच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत आणखी ‘ब्लॅक स्पॉट’ काढण्‍याबाबत चर्चा होईल. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दंडाची रक्कम वाढवूनही लोक नियमांचे पालन करत नाहीत.

- माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री.

चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होतात, असे मुख्यमंत्री म्हणतात. हे म्हणजे आपल्यावरील जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यासारखे झाले. वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची कमी संख्या असून नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळेच अपघात वाढतात. मुख्यमंत्र्यांना खरेच जर अपघात कमी करायचे असतील, तर त्यांनी फातोर्डा येथील बंद पडलेले सिग्नल्स सुरू करावेत.

- विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

SCROLL FOR NEXT