Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच

बांबोळीत दोन वाहनांना धडकून पर्यटक बस कलंडली, 20 जण किरकोळ जखमी

दैनिक गोमन्तक

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळासमोरील महामार्गावर आज शनिवारी दुपारी 11.50 च्या सुमारास एका भरधाव बसने दोन मोटारगाड्यांना धडक दिली. या अपघातात 20 जण किरकोळ जखमी तर बसचालक आणि एका महिलेला जास्त दुखापत झाली. गोमेकॉत उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोलवा येथील एका रिसॉर्टमधील पर्यटकांना घेऊन बस (क्र.जीए 08व्ही 3443) पणजीच्या दिशेने चालली होती. या बसचा वेग इतका होता की दोन मोटारगाड्यांना धडक देऊन ती रस्त्याकडेला जाऊन कलंडली. चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने हा अपघात झाला. सुदैवाने दोन्ही

मोटारगाडीतील व बसमधील प्रवासी किरकोळ दुखापतींवर बचावले. यावेळी बसमधील प्रवाशांनी एकच आक्रोश केला. बसमधून त्यांना बाहेर पडता येत नव्हते. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी बसची दर्शनी काच फोडून प्रवाशांना बाहेर काढले. बसच्या चालकाचा पाय आसनाखाली अडकल्याने त्याला बऱ्याच प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले.

बांबोळी येथे आज अपघात झाला ते ठिकाण वाहतुकीस अतिशय धोकादायक आहे. मडगावकहून पणजीच्या दिशेने जाणारी, सांताक्रूजहून गोवा वैद्यकीय महाविद्यालकडे जाणारी व महामार्गावर जाणारी वाहने या एकाच ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात घडत आहे. वाहतुकीस अतिशय धोकादायक असलेले हे ठिकाण अपघात प्रवण क्षेत्र जाहीर करून त्या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी वाहनचालक व नागरिकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT