Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; दुचाकीस्‍वार युवतीचा दुर्दैवी अंत

Goa Accident News: कासारवर्णेतील दुर्घटना : जखमी दुचाकीचालकाला डिस्चार्ज

दैनिक गोमन्तक

Goa Accident News:

पेडणे तालुक्‍यातील कासारवर्णे येथे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात सुजाता सुरेश सातार्डेकर (25 रा. कळणे-दोडामार्ग) या युवतीचा जागीच मृत्यू झाला.

तर, दुसऱ्या दुचाकीवरील फायझर फ्रान्सिस मास्कारेन्हस (25रा. हसापूर) हा महाविद्यालयीन युवक जखमी झाला. उपचारांसाठी त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

मिळालेल्‍या माहितीनुसार, सुजाता सातार्डेकर ही युवती मोपा विमानतळावर नोकरीला होती. रात्रपाळी संपल्यावर सकाळी ती आपल्या दुचाकीने (एमएच-07-एटी-1150) कळणे-दोडामार्ग येथे घरी जात होती. त्याचवेळी काळाने तिच्यावर झडप घातली.

मोपाचे पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक हळदणकर आणि साहाय्यक उपनिरीक्षक मधुकर मळीक यांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

हेल्‍मेटचे झाले तुकडे

सुजाता कासारवर्णे येथे पोहोचल्यावर एका कारला ओव्हरटेक करताना अंदाज चुकला आणि समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीला तिची जोरात धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, सुजाताच्‍या हेल्मेटचे तुकडे-तुकडे झाले. परिणामी तिच्‍या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्युमुखी पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT