Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: वाळपई रेडीघाटात अपघात सत्र सुरूच

पूल वाहतुकीसाठी धोकादायक ः साकव रुंद करण्याची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News वाळपई होंडा मार्गावरील रेडीघाटात सध्या अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे वाळपईचा रेडीघाटाची आता अपघात ग्रस्त घाट म्हणूनच ओळख होत आहे. भरधाव वेगाने वाहन चालविणे नित्याचेच बनलेले आहे.

वाळपई येथून निघाल्यावर होंडा पणजी मार्गावरील रेडी घाट येथे मध्येच असलेला अरुंद साकव पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे. त्यामुळे हा अरुंद साकव रुंद करण्याची गरज आहे.

हा पणजी मुख्य रस्ता असून दररोज हजारो संख्येने लहान, मोठ्या वाहनांची ये-जा सुरु असते. साकवाजवळ मोठे वाहन आले की समोरून येणाऱ्या वाहनाचालकाला वाहन बाजूला घ्यावे लागते.

या साकवाला धडक देऊन वाहनांचे अपघात झालेले आहेत. हल्लीच दोन चारचाकी वाहनात टक्कर होऊन अपघात घडला होता.

साकवाची एक बाजू खचली

या रेडीघाटात रस्त्याच्या लगतच मोठमोठी जंगली झाडे आहेत. अशी धोकादायक झाडे हटविली पाहिजे. किंवा छाटून तरी घेतली पाहिजेत. प्रवासी वाहने, खासगी वाहने यांची ये-जा नियमीत होत असते. या साकवाला काही प्रमाणात चिराही पडलेल्या आहेत. साकवाची एक बाजू खचलेली आहे.

वाहने चालविताना चालकाने वेगावर नियंत्रण ठेवूनच वाहन चालविले पाहिजे. पण रेडीघाटात भरधाव वेगाने गाडी चालविली जाते. त्यावर नियंत्रण हवे आहे. त्यातच रस्ता व्यवस्थित एका लेवलवर करण्याची गरज आहे व रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्‍यक बनले आहे.

- प्रदीप गवंडळकर, वाळपई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT