Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : अपघात सत्र सुरूच; 24 तासांत 5 अपघातबळी

राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Accident : फोंडा-पणजी महामार्गावरील कुंडई येथे झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार झाला तर पाचजण जखमी झाले. भरधाव ट्रक मानसवाडा-कुंडई येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानावर कोसळल्याने हा अपघात झाला.

ही घटना काल संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. दरम्यान, येथे वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे पंधरवड्यात उपाययोजना करा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

मंगलोर येथून मासे घेऊन रत्नागिरीला निघालेला ट्रकचालकाचा (क्र. केएल 07 सीपी 2580) कुंडई येथे उतरणीवर ताबा सुटल्याने या ट्रकने आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली.

नंतर चिऱ्याच्या दुकानाला धडक देऊन हा ट्रक स्थिरावला. या अपघातात सर्वेश बसाक (32) हा मूळ पश्‍चिम बंगाल पण सध्या कुंडई येथे राहणारा ठार झाला.

या अपघातात दर्शनी दयानंद गावडे (45, कुंडई), उमाजी दीपक नाणूसकर (31, कुंडई, रा. मूळ तिरोडा-सिंधुदुर्ग), विश्‍वजीत म्हसकर (34, कुंडई) तसेच ट्रकचालक बिजील थॉमस (31) व शरथ (34, दोघेही रा. मूळ कोची-केरळ) अशी जखमींची नावे आहेत.

कारचालकाने सोडले प्राण

साळ : नानोडा लाटंबार्से येथे वळणावर 9 फेब्रुवारीला कदंब बस व अल्टो कारमध्ये झालेल्या अपघातात सासरे आणि सून यांचा मृत्यू झाला होता. यावेळी कारचालक आशिष अनंत परब (रा.साळ, डिचोली) हे देखील गंभीर जखमी झाले होते.

काल संध्याकाळी बांबोळी येथे गोमेकॉत उपचारादरम्यान त्‍यांचे निधन झाले. सध्या मृत सून सोनाली यांची आई शुभदा रेडकर (रा. बांदा, सिंधुदुर्ग) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

म्हापशात पोलिस जखमी

म्हापसा : कामरखाजन येथे पर्वरी पोलिस स्थानकातील कॉन्स्टेबल प्रजय तळावणेकर (31, रा. मावसावाडो-पेडणे) यांच्या दुचाकीने बुधवारी रात्री 8 च्या सुमारास प्रवासी टॅक्सीला मागून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.

अटल सेतूवरही अपघात : अटल सेतूवर एका कारचा स्वयंअपघात झाला. यात दोघेजण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT