Goa Accident: कुंडई येथे भरधाव ट्रक थेट दुकानात घुसला! ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू...

5 जण जखमी; एका गायीचाही मृत्यू, दोन दुचाकींचे नुकसान
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak

Goa Accident: फोंडा-पणजी महामार्गावरील कुंडई येथे बुधवारी संध्याकाळी एक भरधाव ट्रक थेट रस्त्याकडेला असलेल्या दुकानात घुसला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

Goa Accident
कुटुंबाला न सांगता गोव्यात आलेल्या प्रेमीयुगूलाचा मृत्यू, पोस्टमार्टमनंतर समोर आली धक्कादायक माहिती

सर्वेश बसाक (वय ३२, मूळ राहणार पश्‍चिम बंगाल, सध्या राहणार कुंडई) असे मृताचे नाव आहे. तर दर्शनी दयानंद गावडे (वय ४५, कुंडई), उमाजी दीपक नाणूसकर (वय ३१, मूळ रा. तिरोडा - सिंधुदुर्ग पण सध्या राहणार कुंडई), विश्‍वजीत म्हसकर (वय ३४, कुंडई) तसेच ट्रकचालक बिजील थॉमस (वय ३१) व शरथ (वय ३४, दोघेही मूळ कोची - केरळ) हे जखमी झाले आहेत.

जखमींपैकी विश्‍वजीत म्हसकर याला पुढील उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल केले गेले. इतरांवर फोंडा उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

हा अपघात आज (बुधवारी) संध्याकाळी पाचच्या सुमारास घडला. दरम्यान, मानसवाडा - कुंडई हा रस्ता केवळ सर्विस रोड म्हणून ठेवून पेट्रोलपंपजवळून काढलेल्या रस्त्यावरून एकेरी वाहतूक न करता दुहेरी वाहतूक सुरू करा, अशी मागणी स्थानिक नागरिकांना केली आहे.

१५ दिवसांत मागणी मान्य न केल्यास कुंडईत रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे.

Goa Accident
Goa PSI Recruitment scam: शाहांच्या खात्याने दिला दणका; 15 दिवसात अहवाल सादर करा, DGP ना आदेश

मंगलोर येथून मासे घेऊन रत्नागिरी येथे निघालेल्या केएल ०७ सीपी २५८० या क्रमांकाचा ट्रक कुंडई येथे उतरणीवर येताच ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने या ट्रकने आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. नंतर ट्रक दुकानात घुसला. अपघातामुळे मोठा आवाज झाला.

फोंडा पोलिस व अग्निशामक दलानेही घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. चिऱ्यांचे दुकान उद्धवस्त झाले. एक भिंत तेवढी शिल्लक राहिली. ढिगाऱ्याखाली दोन तास अडकलेल्या सर्वेश बसाक याचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रक उचलण्यासाठी दोन क्रेन आणाव्या लागल्या.

अपघातात एक गायही दगावली. तर दोन दुचाक्यांचेही नुकसान झाले. जखमी दर्शनी गावडे या कुंडई येथील औद्योगिक वसाहतीतील काम आटोपून घरी परतत होती. तिच्या हाताला जबर मार बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com