Bicholim Accident News Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: काळ आला होता पण..! वाठादेव बगलमार्गावर पुन्हा अपघात; पायलट थोडक्यात बचावला

गोमन्तक डिजिटल टीम

Vathadev Junction Bypass Accident

डिचोली: शहरातील चौपदरी बगलमार्गावरील वाठादेव जंक्शनवर ओम्नी व्हॅनची धडक बसून झालेल्या अपघातात शहरातील एक मोटारसायकल पायलट सुदैवाने बचावला. हा अपघात सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात बचावलेल्या पायलटचे नाव भारत असे असून, त्याच्या पायाला तसेच पाठीला मार बसला आहे.

यासंबंधीची माहिती अशी की, डिचोली बसस्टॅण्डवर भाडी मारणारे भारत हे आपल्या (जीए-०४-टी-५४७३) या मोटारसायकलवरून साखळीच्या दिशेने जात होते. बगलमार्गावरील वाठादेव जंक्शनवर पोहचताच समोरून बगलमार्गावर जाण्याच्या प्रयत्नात असताना जीए-०८-एफ-०१३२ या क्रमांकाच्या ओमनी व्हॅनची मोटारसायकलला जोरदार धडक बसली. त्याबरोबर मोटारसायकलसह पायलट भारत हे रस्त्यावर पडले. त्यात ते जखमी झाले.

पायलट रस्त्यावर पडले, त्यावेळी मागाहून वाहन नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, गेल्या ६ जून रोजी लोकार्पण केल्यानंतर बगलमार्गावर अपघात घडत आहेत. वाठादेव जंक्शनवर दोन मिळून आतापर्यंत बगलमार्गावर दहा अपघात झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी या जंक्शनवर झालेल्या अपघातात एक दाम्पत्य जखमी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Smart City: प्रशासन 'पुन्हा' अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? 'सांतिनेज-पणजी' येथे पुन्हा झाडांकडे अक्षम्य दुर्लक्ष

Goa Art: कॉमर्समधून पदवी घेतलेल्या आशिषचा चित्रकारापर्यंतचा प्रवास, कला क्षेत्रात आर्थिक स्थैर्य असते का?

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

Mhadei River Dispute: कर्नाटकाने असं पळवलं पाणी, गोव्यातील वकिलांची फौज करते काय?

SCROLL FOR NEXT