Bus Accident Dainik Gomantak
गोवा

Bus Accident: पणजी बस स्थानकावर इलेक्ट्रिक कदंबा व खासगी बस यांच्यात अपघात

सुदैवाने जीवितहानी नाही; अपघातामुळे प्रवाशांना सहन करावा लागला त्रास

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी बसस्थानकावर खासगी बस व इलेक्ट्रीक कदंबा यांच्यात अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी घडला. या अपघातामुळे मात्र प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. यावेळी प्रवाशांनी खासगी बसचालकांच्या मुजोरीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी पणजी बसस्थानकावर खासगी बस व इलेक्ट्रीक कदंबा यांच्यात अपघात झाला. खासगी बसेस कुठेही स्टॉप मारुन प्रवाशांना उतरवतात, तसेच त्यांना हवे तिथे बसेस पार्क करतात अशा कारणांमुळे हे असे अपघात वारंवार घडत असतात अशी प्रतिक्रिया संतप्त प्रवाशांनी व्यक्त केली. सकाळी व सायंकाळी बस स्थानकावर बसेसची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असल्याने कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. आरटीओने याबाबत लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT