Mapusa Accident Dainik Gomantak
गोवा

Mapusa Accident: काम सुरु होण्यापूर्वीच अपघात! म्हापश्यात वीज खात्याने आणलेली साडेचार कोटींची मशीन उलटली

हे मशीन ट्रॉलरमधून उतरवताना अपघात घडल्याचे समजले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Accident म्हापसा दत्तवाडी येथे भूमिगत वीजवाहिन्या घालण्यासाठी आणलेली हायड्रॉलिक ड्रिलिंग मशीन ट्रॉलरमधून उतरवताना अपघात घडला. सदरचे काम सुरु होण्यापूर्वीच मशीन रस्त्याच्या कडेला उलटली.

सेंट झेवियर्स कॉलेज रोड येथे दुपारी 1वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सदर मशीनची किंमत 4.5 कोटी प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

कामकाजासाठी आणलेले हे मशीन ट्रॉलरमधून उतरवताना अपघात घडल्याचे सूत्रांकडून समजले आहे. दरम्यान रस्त्याच्या कडेला हे मशीन उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र तातडीने हे मशीन हटवण्यासाठी वीज वितरण विभागाकडून क्रेन मागवण्यात आली आहे.

दरम्यान गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय.

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येतायत. पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT