Acciden at new zuari bridge goa  Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: नवीन झुवारी पुलावर भीषण अपघात; दोघे जखमी

Goa Accident: पूलावरून प्रवास करणाऱ्या चारचाकी आणि टेम्पोत भीषण अपघात घडला

गोमन्तक डिजिटल टीम

नवीन झुवारी पूलावरून प्रवास करणाऱ्या चारचाकी आणि टेम्पोत भीषण अपघात घडला. नवीन झुवारी पुलावरून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या निखिल आगरवाडेकर (म्हापसा) याचा त्याच्या चारचाकीवरील ताबा सुटल्याने पुलाच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडक देऊन दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या टेम्पोवर धडकून पुन्हा दुसऱ्या बाजूला आली. यात चारचाकीचा चुराडा झाला, तसेच टेम्पोचे नुकसान झाले. पुलावरील एका पथदीपाचा खांबही कोसळला. मात्र दैव बलवत्तर म्हणून दोन्ही वाहनचालक किरकोळ जखमांवर निभावले.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडला. आगरवाडेकर पणजीच्या दिशेने चारचाकीने जात असता दुभाजक ओलांडून कुठ्ठाळीच्या दिशेने जाणाऱ्या टेंम्पो (क्र.जीए ०३ एन ३७६६) वर धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की चारचाकी पुन्हा जात असलेल्या दिशेने आली. चारचाकीत अडकलेल्या निखिल याला लोकांनी बाहेर काढून गोमेकॉत पाठवले. तसेच किरकोळ जखमी झालेला टेम्पोचा चालक प्रकाश राऊळ (सावंतवाडी) यांनाही उपचारासाठी इस्पितळात पाठवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT