Driving School Car Accident Dainik Gomantak
गोवा

Accident at Curchorem: कुडचडेत ड्रायव्हिंग स्कूलच्या कारला बसची धडक; मुलगी जखमी

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते घटनेचा पंचनामा करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Driving School Car Accident: गोव्यातील अपघातात घट व्हावी यासाठी सरकार, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस सतर्क असूनही हे प्रकार कमी होण्याचे नाव घेत नाही. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, कुडचडे येथे एका ड्रायव्हिंग स्कूलच्या कारचा अपघात झाला असून त्यामध्ये ड्रायव्हिंग शिकणारी मुलगी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कुडचडे येथील चर्च रोडनजीक रस्त्यावर ड्रायव्हिंग शिकत असताना, मागून कुडचडे ते मडगाव मार्गावर प्रवास करणाऱ्या खाजगी बसची कारला धडक बसली. यामध्ये ड्रायव्हिंग शिकणाऱ्या मुलीला गाडी आवरता न आल्याने ती बाजूच्या शेतात जाऊन कोसळली. मुलीच्या मानेला दुखापत झाली असून ती जखमी झाली आहे.

तिला कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ड्रायव्हिंग कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर खाजगी बसच्या समोरील एका बाजूचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते घटनेचा पंचनामा करत आहेत.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दरम्यान, कुचेली येथे एका भरधाव दुचाकीस्वाराने तीन वर्षीय चिमुकल्याला जोरात धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. सुदैवाने हा मुलगा किरकोळ जखमी होऊन बचावला. हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी संशयिताला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT