New Zuari Bridge: Dainik Gomatak
गोवा

New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्‍या उर्वरित कामाला गती

New Zuari Bridge: अंतिम सेगमेंट : पावसामुळे आली होती मरगळ; नोव्‍हेंबरनंतर सुरू होणार दुसरी बाजू

दैनिक गोमन्तक

New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या बाजूला उर्वरित राहिलेल्या अंतिम सेगमेंट बसवण्याचा कामाला आज सोमवारी दुपारी प्रारंभ झाला.

गांधी जयंती दिवशी हे काम सुरू झाले आहे. पहिली आठ वर्षे नवीन केबल स्टेड पुलाची देखरेख ‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनी करणार आहे.

आज दुपारी तीनच्या सुमारास दिलीप बिल्डकॉनच्या कामगारांनी नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या अंतिम सेगमेंट बसवण्याचे काम हाती घेतले.

गेले काही दिवस सलग पाऊस पडत असल्याने या पुलाचे उर्वरित काम अतिशय मंदगतीने चालले होते.

परंतु सोमवारी जसा पावसाचा जोर कमी झाला आणि कंपनीचे कामगार तसेच अभियंते कामास पुढे सरसावले.

नवीन झुआरी पुलाची उर्वरित बाजू जेव्हा रहदारीसाठी खुली केली जाईल तेव्हा त्याचा फायदा वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात होईल.

मुख्य म्हणजे वाहतुकीची कोंडी, अपघात अशा प्रकारांना आळा बसेल, असे अनेकांचे मत आहे.

पुलाचे आयुर्मान असेल 120 वर्षे!

नवीन झुआरी पुलासाठी सुमारे 200 हून अधिक केबल्सचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे आयुर्मान हे 120 वर्षे असेल असे सांगण्यात येत आहे.

पुलाची देखरेख ही अगोदरची आठ वर्षे दिलीप बिल्डकॉन कंपनी करेल तर नंतर हा पूल गोवा सर्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविण्यात येणार आहे.

कुठल्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्याअखेरीस नवीन झुआरी पुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल. त्‍यानंतर पुलाची दुसरी बाजू रहदारीसाठी खुली होईल.
- अतुल जोशी, ‘दिलीप बिल्डकॉन’चे वरिष्ठ अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT