Goa School  Dainik Gomantak
गोवा

Goa Schools Reopening: गोव्यात एक एप्रिलपासून सुरु होणार शाळा; मोफत पुस्तके, मिड - डे मिल मिळवण्यासाठी Apaar ID बंधनकारक

Goa School Schedule: सहावी ते दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक एप्रिलपासून सुरु होतील.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात एक एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष २०२५ - २०२६ सुरु होणार आहे. सहावी ते दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक तारखेपासून सुरु होतील, अशी माहिती शिक्षण खात्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच, विद्यार्थ्यांंना मोफत पुस्तके, मिड - डे मिल असे लाभ मिळवण्यासाठी Apaar ID बंधनकारक करण्यात आले आहे.

शिक्षण खात्याने प्रिसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शैक्षणिक वर्ष २०२५ - २०२६ एक एप्रिलपासून सुरु होईल. सहावी ते दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक तारखेपासून सुरु होतील. सकाळी अकरा वाजेपर्यंत या वर्गांचे क्लास घेतले जातील.

या विद्यार्थ्यांसाठी १ मे ते ०३ जून पर्यत उन्हाळी सुट्टी दिली जाईल. अशी माहिती खात्याने दिली आहे. तर, ०४ जून पासून शाळाचे नियमित वेळेत वर्ग सुरु होतील. एक एप्रिलपासून वर्ग सुरु करण्याबाबत उपाययोजना करण्याचे सूचनाही शाळांना देण्यात आले आहेत.

अपार ओळखपत्र बंधनकारक

शालेय विद्यार्थ्यांना अपार ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके, मिड-डे मिल आणि इतर सरकारी लाभ मिळवण्यासाठी ओळखपत्र महत्वाचे असेल. याशिवाय मायग्रेशन प्रमाणपत्र किंवा एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी देखील अपार ओळखपत्र महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहन पार्किंगचे दर वाढले!

Purple Fest: आमीरसोबत 'सितारे जमीन पर'ची टीम येणार गोव्यात? कलाकारांना केले आवाहन; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

'गुंड निर्धास्‍त आणि सामान्‍य जनता घाबरली आहे'! सरदेसाईंचे टीकास्त्र; काणकोणकर हल्‍लाप्रकरणी सूत्रधाराचे नाव जाहीर करण्याची मागणी

Chimbel: 'सरकारने हट्टाला पेटू नये, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये', चिंबलवासीय लढ्याच्या तयारीत; युनिटी मॉलला कडाडून विरोध

Thimmappiah Tournament: ..पुन्हा तेंडुलकरने सावरले! गोव्याच्या फलंदाजांची घसरगुंडी; द्विशतकी आघाडीमुळे स्थिती भक्कम

SCROLL FOR NEXT