APAAR ID: गोव्यातील 'मेगा अपार दिवस' ठरला; लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल ओळखपत्र

Unique ID for Students in Goa: शिक्षण संचालनालयाने येत्या ९ आणि १० डिसेंबरला 'मेगा अपार दिवस' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे
Unique ID for Students in Goa: शिक्षण संचालनालयाने येत्या ९ आणि १० डिसेंबरला 'मेगा अपार दिवस' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे
Unique ID for Students in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Mega AAPAR ID card day in Goa

पणजी: राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी (अपार) आयडी निर्मिती प्रक्रियेला गती देण्यासाठी, शिक्षण संचालनालयाने येत्या ९ आणि १० डिसेंबरला 'मेगा अपार दिवस' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे राज्यातील शाळा विद्यार्थ्यांचे अपार कार्ड बनविण्यावर भर देतील. अपार हा १२ अंकी आयडी आहे जो खाजगी, अनुदानित आणि सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जाईल.

देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना युनिक आयडी क्रमांक देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंतर्गत अपार ओळखपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला ऑक्टोबर महिन्यात सुरूवात करण्यात आली होती आणि १३ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्राचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण संचालनालयाने ठेवले होते.

Unique ID for Students in Goa: शिक्षण संचालनालयाने येत्या ९ आणि १० डिसेंबरला 'मेगा अपार दिवस' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे
AAPAR ID: विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं!! गोव्यात बनणार 12 अंकी AAPAR ID

या कार्डमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक डेटा, कामगिरी, रिपोर्टकार्ड डिजिटल स्वरूपात मिळेल. त्यासोबत एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी देखील हे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय हे कार्ड विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि उपलब्धी सहजतेने ट्रॅक करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com