Goa University  Dainik Gomantak
गोवा

गोवा विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा घसरला

भोंगळ कारभार: ‘नॅक’च्या मानांकन यादीत ‘ए’ श्रेणीवरून ‘बी प्लस प्लस’ वर घसरण

दैनिक गोमन्तक

मडगाव: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शिक्षित राज्य असलेल्या गोव्याचा शैक्षणिक स्तर देश पातळीवर उतरत असल्याचा दावा होत असतानाच ‘नॅक’ संस्थेने जारी केलेल्या मानांकनात गोवा विद्यापीठाचा दर्जा घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. भोंगळ कारभार आणि राज्य सरकारची विद्यापीठाप्रती असलेली अनास्था, हे त्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते.

नॅकच्या नव्या मानांकन यादीत गोवा विद्यापीठाला 2.83 गुणांसह बी प्लस प्लस मानांकन मिळाले आहे. 2014 ते 2019 या कालावधीतील विद्यापीठाच्या कार्यावर आधारित हे मानांकन असून त्यापूर्वी गोवा विद्यापीठाला 3.60 गुणांसह ‘ए’ मानांकन प्राप्त झाले होते.

शिक्षक भरतीसाठी झालेली हयगय आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचे गुण विश्लेषण करण्याची परिपूर्ण नसलेली यंत्रणा या दोन मुद्द्यांवर ही घसरण झाल्याचे सांगितले जाते. या नव्या मानांकन यादीने गोवा विद्यापीठाची अब्रूच वेशीवर टांगली गेली असून राज्य सरकारही शिक्षणाप्रती किती बेफिकीर आहे हे उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया याच विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका शिक्षकाने व्यक्त केली.

शिक्षकांच्या 50 टक्के जागा रिक्त

गोवा विद्यापीठाच्या या घसरलेल्या दर्जाबद्दल मत व्यक्त करताना एका शिक्षकाने याला विद्यापीठ, तेवढेच गोवा सरकारही जबाबदार असल्याचे सांगितले. विद्यापीठातील जुने शिक्षक निवृत्त होत असताना ज्या गतीने नव्या शिक्षकांची भरती होणे आवश्यक होते, ती मागच्या १५ वर्षांत केलीच नाही. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक जागा खाली राहिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Casaulim: ..आणखीन एक खळबळजनक घटना! शेतात आढळली मानवी कवटी; कासावली परिसरात भीतीचे वातावरण

Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

Goa Latest Updates: गोवा प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी अर्चित नाईक

VIDEO: साळगावमध्ये 'रेंट-ए-बाईक' वादातून राडा, टोळक्याकडून पिता-पुत्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी

Cyber Crime Goa: काळजी घ्या! गोव्यात सायबर भामट्यांकडून सुमारे 74 कोटींचा चुना! ज्‍येष्‍ठ नागरिक होताहेत टार्गेट

SCROLL FOR NEXT