Goa Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: घरात घुसून जाळण्याचा प्रयत्न, बदला घेण्यासाठी तरुणाचं कृत्य; कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा

Abhishek Hiremath Sentenced To 3 Years: घरात शिरून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला अभिषेक हिरेमठ (२७) याला न्यायालयाने मंगळवारी तीन वर्षांची सक्त मजुरीचा शिक्षा व १५ हजारांचा दंड ठोठावला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: घरात शिरून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला अभिषेक हिरेमठ (२७) याला न्यायालयाने मंगळवारी तीन वर्षांची सक्त मजुरीचा शिक्षा व १५ हजारांचा दंड ठोठावला. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. सरकार पक्षातर्फे ॲड. व्ही. जे. कॉस्ता यांनी युक्तिवाद केला.

आरोपीने (Accused) या खटल्यात यापूर्वीच तुरुंगात तीन वर्षे काढली असल्याने तो काळ शिक्षा म्हणून गृहीत धरण्‍यात आला आहे. केपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत अभिषेकने वरील गुन्हा केला होता. त्याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्‍या ३०७, ४५७, ४५९ कलमांनुसार गुन्हा नोंद केला होता. ८ डिसेंबर २०२१ साली वरील घटना घडली होती.

रॉकेल ओतून पेटवून देण्‍याचा प्रयत्‍न फसला

लक्ष्मीकांत शिकेरकर हे तक्रारदार आहेत. आरोपी त्यांच्या घराची कौले काढून आत शिरला होता. सोबत त्याने ५ लिटर पेट्रोल, २ लायटर, चाकू व दांडाही नेला होता. बेडरूममध्ये जाऊन त्याने तक्रारदाराची पत्नी मंदाकिनी शिकेरकर हिच्या पर्समधील ६ हजार ९९० रुपये चोरले होते. मागाहून हॉलमध्ये जाऊन त्याने तक्रारदारावर पेट्रोल ओतले होते. पण त्याला पेटवून देण्याचा त्याचा प्रयत्न फसला होता. घरातील लोकांनी त्याला पकडले. अभिषेक हिचे मंदाकिनीशी भांडण झाले होते. त्याच्या सूड उगविण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Property Fraud: 5 लाखांत फ्लॅटचे स्वप्न दाखवले, 250 जणांना 4 कोटींचा गंडा; आरोपी उत्तर प्रदेशात अटकेत

Tourist Robbery: 'एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या बहाण्याने पर्यटकाची लूट, रोशनीविरुद्ध न्यायालयाचा मोठा निर्णय

Jennifer Barreto Miss Universe 2026: प्यूर्टो रिकोने रचला इतिहास! 75व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत जेनिफर बॅरेटोने पटकावले विजेतेपद; मायभूमीतच मिळवले यश VIDEO

Jewellery Robbery: ओळखीचा फायदा घेत 75 वर्षीय वृद्धेला लुटले; सीसीटीव्हीमुळे महिला जेरबंद, 5 लाखांचे दागिने जप्त

Women Employment Schemes:16 सरकारी खाती, 60 योजना अन् 24 प्रशिक्षण संस्था; महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

SCROLL FOR NEXT