Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: अमलीपदार्थ बाळगल्‍याप्रकरणी जामीन फेटाळला

अभिषेक संजय चौधरी या आरोपीला 2 ऑगस्‍ट 2023 रोजी मध्‍यरात्रीनंतर छापा मारुन अटक केली होती.

Shreya Dewalkar

नवतारा येथे हाॅटेलमध्ये मॅनेजर म्‍हणून काम करणारा आणि सुमारे दोन किलोहून अधिक वजनाचा अमलीपदार्थ जवळ बाळगल्‍याचा आरोप असलेल्‍या अभिषेक संजय चौधरी या आरोपीचा जामीन अर्ज मडगावच्‍या सत्र न्‍यायालयाने फेटाळून लावला.

अभिषेक संजय चौधरी या आरोपीला 2 ऑगस्‍ट 2023 रोजी मध्‍यरात्रीनंतर छापा मारुन अटक केली होती. या आरोपीची झडती घेतली तेव्‍हा त्‍याच्‍याकडे दोन किलो वजनाचा गांजा, 5 ग्रॅम मेथाम्‍फेटामाईन जप्‍त करण्‍यात आला होता. या पदार्थांची बाजारातील किंमत सुमारे 2 लाख 50 हजार इतकी होते. या आरोपीला त्‍याच दिवशी अटक करण्‍यात आली होती.

या प्रकरणातील आरोपी हा बिगर गोमंतकीय असून जामिनावर साेडल्‍यास तो फरारी होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नसल्‍याचा युक्‍तीवाद सरकारी वकील व्‍ही. जी. कॉस्‍ता यांनी केला होता. न्‍या. आगा यांच्‍या न्‍यायालयाने दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद ऐकून घेतला आणि तपास यंत्रणेला अवधी दिला पाहिजे असे सांगून या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT