Sal  Dainik Gomantak
गोवा

Sal News : पीर्ण अभंग गायन स्पर्धेत अवनी, दीपा ठरल्या विजेत्या

Abhang singing competition : श्री शांतादुर्गा मंदिरात आयोजन ः बक्षीस वितरण सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

साळ, पीर्ण येथील श्री शांतादुर्गा पांडुरंग भजनी सप्ताह आणि सांस्कृतिक समिती तसेच कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिरात अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले होते.

कनिष्ठ गटात अवनी चोडणकर हिने तर ज्येष्ठ गटात दीपा सावंत हिने विजेतेपद पटकावले.बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पीर्णचे सरपंच संदीप शेट तानावडे, पंच अनिल नाईक , नारायण हळदणकर, विश्वनाथ खलप, प्रशांत नाईक , आनंद नाईक, प्रकाश नाईक , नितेश सावंत , श्रद्धा जोशी , वासुदेव परब आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेला आनंद नाईक (हार्मोनियम ) व प्रशांत नाईक (तबला ) यांनी संगीत साथ केली. वासुदेव परब, श्रद्धा जोशी व नितेश सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . स्पर्धेचे उद्‍घाटन परीक्षक नितेश सावंत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी पंचसदस्य अनिल नाईक, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रकाश नाईक, विश्वनाथ खलप, परीक्षक वासुदेव परब, श्रद्धा जोशी ,नितेश सावंत, हार्मोनियम वादक आनंद नाईक , तबलावादक प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धेश शेट तानावडे यांनी आभार मानले.

दोन गटांत स्पर्धा

स्पर्धा पीर्ण गाव मर्यादित होती तसेच कनिष्ठ गट (वय १० ते १७ वर्षे व ज्येष्ठ गट (वय १८ ते ४० वर्षे) अशा दोन गटात झाली. कनिष्ठ गटात - अवनी चोडणकर (प्रथम), विशाल शेट तानावडे (द्वितीय), जस्मिता परवार (तृतीय), तर साईश शेटये, वैष्णवी जाधव व अंश गडेकर यांना उत्तेजनार्थ, वरिष्ठ गटात - दीपा सावंत (प्रथम), दीपक नाईक (द्वितीय), वृषाली खलप (तृतीय), तर अरुणा ह. नाईक, माधुरी नाईक व रोहित परब यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: ताबा सुटला, गोव्यात पर्यटकाची कार भिंतीला - ट्रकला धडकली; झारखंडची व्यक्ती जागीच ठार; Watch Video

Ranji Trophy: विजयासाठी गोव्याला 7 विकेटची गरज! फॉलोऑननंतर चंदीगडचा चिवट प्रतिकार; अर्जुनची झुंझार फलंदाजी

Ronaldo Goa Visit: रोनाल्डो गोव्यात फुटबॉल खेळणार? प्रशासन सज्ज; 22 ऑक्टोबर रोजी होणार सामना

Mhaje Ghar: ‘माझे घर’ला का विरोध केला हे विरोधकांना विचारा! CM सावंतांचे सांगेवासीयांना आवाहन

Goa Road Repair: 'नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्ते उत्तम स्थितीत', मंत्री कामतांनी दिली ग्वाही; रस्ता खोदणाऱ्यांसाठी दिला इशारा

SCROLL FOR NEXT