Abhang Repost  Dainik Gomantak
गोवा

Abhang Repost: ‘चल ग सखे... पंढरीला'! म्‍हापशात ‘अभंग रिपोस्‍ट’चा जल्लोष; भक्तिरसात न्हाले शहर

Abhang Repost Mapusa Goa: नाचायला ड्रग्स, ड्रिंक लागते हे गृहीतक चुकीचे आहे. संतांच्या अभंगावरही तरुणाईला नाचवता येते, शिवाय त्‍यातून मिळणारा सात्त्विक आनंद शब्‍दातीत असतो, हे ‘अभंग रिपोस्‍ट’ने सिद्ध केले.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा म्हणजे सनबर्न ईडीएम, ट्रान्स पार्ट्या, बीच पार्ट्या, रात्री अपरात्री चालणाऱ्या पार्ट्या व त्या पार्ट्यांमध्ये बेधुंद होऊन नाचण्यासाठी लागणारे ड्रग्स आणि दारू नव्‍हे; तर त्‍या पलीकडे आधुनिक पद्धतीने नवी पिढी अभंगांचा ठेवा जपते, असे कृतिशील उदाहरण म्‍हापशात कित्‍येकांनी अनुभवले.

निमित्त होते २ डिसेंबरला म्‍हापशात झालेल्या ‘अभंग रिपोस्‍ट’चे. मराठी अभंग गाणाऱ्या बँडने तब्बल पाच ते साडेपाच हजार तरुणांना, लहानापासून थोरांपर्यंत साऱ्यांना विठ्ठल नामाच्या गजरात अक्षरशः ठेका धरून तब्बल ३ तास ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अनुभूती दिली. यावेळी म्हापसा शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव’, ‘चल ग सखे... पंढरीला’, ‘आम्ही बी घडलो, तुम्हीमबी घडा ना’, ‘एकनाथी भारुड’, ‘जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी’ व ‘निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम’ या गजराच्या ठेक्यावर तरुणाई तहान, भूक विसरून आनंद लहरी अनुभवत होती.

‘युवा दी म्‍हापसा’ने आयोजित केलेल्या ‘अभंग रिपोस्‍ट’ या कार्यक्रमाला ‘न भूतो, न भविष्यती’, असा प्रतिसाद लाभला. नाचायला ड्रग्स, ड्रिंक लागते हे गृहीतक चुकीचे आहे. संतांच्या अभंगावरही तरुणाईला नाचवता येते, शिवाय त्‍यातून मिळणारा सात्त्विक आनंद शब्‍दातीत असतो, हे ‘अभंग रिपोस्‍ट’ने सिद्ध केले.

कार्यक्रमासंदर्भात अभंगांचे चाहते तुषार केळकर यांनी सांगितले, सनबर्न आणि तत्‍सम ईडीएममुळे जगभर गोव्याची बनलेली नकारात्‍मक प्रतिमा बदलण्याचे काम ‘अभंग रिपोस्‍ट’ या बँडने केले आहे. त्‍याचे कार्यक्रम अन्‍यत्रही व्‍हावेत. म्‍हापशात लाभलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे.

संत अभंगवाणीत कमालीचे सामर्थ्य आहे. ते तरुण पिढीपर्यंत पोहोचणे अगत्‍याचे आहे. त्‍यासाठी युवा दी म्‍हापसाने केलेले प्रयत्‍न कौतुकास्‍पद आहेत.
विक्रमादित्‍य पणशीकर, सामाजिक कार्यकर्ते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: किंग कोहलीची बॅट 'फायर' मोडवर...! विराटच्या निशाण्यावर मोठा ऐतिहासिक रेकॉर्ड; सलग तिसरे वनडे शतक ठोकण्याची सुवर्णसंधी

Partgali Banyan Tree: 1000 वर्षे जुना, तळपण नदीच्या उजव्या काठावरती वसलेला, पर्तगाळी येथील 'पवित्र वटवृक्ष'

Serendipity Art Festival: क्ले‌ प्ले, मोटाऊन मॅडनेस, रिफ्लेट! 'सेरेंडिपीटी'त अनुभवा जादुई सादरीकरणे

World Soil Day: चिंताजनक! 2045 पर्यंत पृथ्वीवर 40% कमी अन्न तयार होण्याची शक्यता; गोव्यासमोरही मोठी समस्या..

Weekly Horoscope 2025: पैसा ही पैसा! 'या' तीन राशींचे लोक होणार मालामाल, बँक बॅलन्स बघून जळतील शेजारी; वाचा 'सुपर वीक'चा प्लॅन

SCROLL FOR NEXT