AAP Protest Goa Smart Meter Dainik Gomantak
गोवा

वीजमंत्र्यांच्या घराबाहेर 'आप'चा मोर्चा! स्मार्ट मीटर आणि दंड वसुलीवरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

AAP Protest Goa Smart Meter: स्मार्ट वीज मीटर आणि ग्राहकांना आकारलेली दंडात्मक रक्कम त्वरित रद्द करा, अशी मागणी करत आम आदमी पक्षाने शनिवारी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या बांदोडा येथील निवासस्थानी मोर्चा काढला.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा : स्मार्ट वीज मीटर आणि ग्राहकांना आकारलेली दंडात्मक रक्कम त्वरित रद्द करा, अशी मागणी करत आम आदमी पक्षाने शनिवारी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या बांदोडा येथील निवासस्थानी मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा नागेशी येथे पोलिसांनी अडविला. त्‍यानंतर आंदोलनकर्त्यांनी साहाय्‍यक मामलेदारांना निवेदन सादर करून निषेध नोंदविला.

यावेळी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप करत, ही योजना आणि ग्राहकांवर लादण्यात आलेला दंड तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वीज भाराच्या कारणावरून अनेक ग्राहकांना हजारो रुपयांचे दंड आकारण्यात आले असून ही कारवाई अन्यायकारक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

निवेदन सादर केल्यानंतर सुमारे दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, संदेश तेलेकर देसाई, गीतेश नाईक तसेच प्रदेश महिला अध्यक्षा ममता माबेन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागेशी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, पोलिस निरीक्षक तसेच साहाय्‍यक मामलेदार मेघना नाईक यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले.

मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेणे गैर : मगो

या आंदोलनावर मगो पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. कोणत्याही मंत्र्याच्या निवासस्थानावर मोर्चा नेणे योग्य नसून संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेणे अधिक योग्य ठरले असते, अशी भूमिका मगोच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

अशा प्रकारचे आंदोलन हे केवळ प्रसिद्धीसाठी असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, रामचंद्र नाईक, चित्रा फडते, राजेश कवळेकर, मुक्ता नाईक, वामन नाईक, व्यंकटेश गावडे आदी उपस्थित होते.

ढवळीकरांची टीका

‘आप’च्‍या सरकारने दिल्ली आणि पंजाबमध्ये स्मार्ट मीटरचे समर्थन केले आहे. त्यांनी इतरांना शिकवू नये, असे वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले. अवघ्याच लोकांच्या या मोर्चात महिलांकडे वीज नव्हे तर पाण्याची बिले होती.

नेमके कशासाठी आपण आलोय, हेच या महिलांना माहीत नव्‍हते. आपण कधीच कोणावर आक्षेपार्ह टिप्पणी केलेली नाही. ‘आप’ आणि ‘आरजी’ हे नवीन आहेत तर मगो हा गेली अनेक वर्षे गोव्याच्या मातीत ठामपणे उभा आहे, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Youth Movement Against Paper Leak: अहंकाराचा पराभव अन् युवाशक्तीचा विजय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामागील 'जेन-झी'ची ताकद

Viral Video: दारूच्या नशेत जीव धोक्यात! रेल्वे रुळावर पडला तरुण; वेगात ट्रेन आली अन्... थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल

Student Protest Over Paper Leak: 36 दिवसांचा लढा यशस्वी! 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनासमोर मोदी सरकारला अखेर नमते घ्यावेच लागले

Goa E Tender Process: राज्यातील काही ग्रामपंचायतींकडून ई-निविदा नियम धाब्यावर; पाच लाखांवरील टेंडर पद्धतीत गैरव्यवहार

CWG 2026 मध्ये थरारक अपघात! हाय बारवरून थेट डोक्यावर कोसळला इंग्लंडचा खेळाडू; तातडीने रुग्णालयात दाखल VIDEO

SCROLL FOR NEXT