Sal river Dainik Gomantak
गोवा

Venzy Viegas : साळ नदीतील प्रदूषण बंद न झाल्यास कोर्टात खेचू; वेंझींचा पर्यावरण मंत्री काब्राल यांना इशारा

सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पातून अजूनही दूषित पाणी सोडत असल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Venzy Viegas : सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पातून अजूनही दूषित पाणी साळ नदीत सोडले जात असल्याचा आरोप बाणावलीचे आमदार वेंझी विएगस यांनी केला असून हा प्रकार बंद झाला नाही तर पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांना कोर्टात खेचू असा इशारा त्यांनी दिला.

आज सायंकाळी या प्रकल्पातून शुध्दीकरण न केलेले पाणी सरळ साळ नदीत सोडून दिल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक युवकांनी विएगस यांना तिथे बोलावून घेतले. आपण आल्याचे कळल्यावर हे दूषित पाणी सोडणे बंद केले असा दावा त्यांनी केला.

मी नोव्हेंबर महिन्यात हा प्रकार उघडकीस आणला होता. मात्र, अजूनही तो चालूच आहे. वास्तविक हे प्रदूषण बंद करणे प्रदूषण नियंत्रण मंडळाची जवाबदारी आहे.

पण ते ही जबाबदारी पूर्ण करत नाहीत. मंडळाच्या सदस्य सचिवांवर याप्रकरणी तुरुंगात जाण्याची पाळी येणार याची जाणीव त्यांनी ठेवावी असाही इशारा त्यांनी दिला.

मागच्या नोव्हेंबर महिन्यात विएगस यांनी साळ नदीत सांडपाणी सोडले जाात असल्यामुळे ती कशी प्रदूषित होत आहे हे उघडकीस आणले होते. त्यावेळी त्यांनी काब्राल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केल्यानंतर त्यांच्यात आणि काब्राल यांच्यात मोठा वादही झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT