Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: युती हवीय? 'आधी पक्षाची सफाई करा', आप आमदार क्रूझ सिल्वा यांचा काँग्रेसला खोचक टोला

Goa AAP: युतीच्‍या मार्गात अडथळे निर्माण झाले आणि याला सर्वस्‍वी काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोप ‘आप’चे वेळ्‍ळीचे आमदार क्रूझ सिल्‍वा यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: भाजपचा गोव्‍यात पराभव व्‍हायचा असेल तर सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी सर्वसाधारण गोवेकरांची इच्‍छा असली तरी लोकसभा निवडणुकीवेळी ‘आप’ आणि काँग्रेस यांचा एकमेकांवर असलेला विश्‍वास ढळल्‍यानेच युतीच्‍या मार्गात अडथळे निर्माण झाले आणि याला सर्वस्‍वी काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोप ‘आप’चे वेळ्‍ळीचे आमदार क्रूझ सिल्‍वा यांनी केला.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्या ‘साश्‍‍टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात बाेलताना सिल्‍वा यांनी काँग्रेसवर टीका केली. गोव्‍यात ‘आप’ आणि काँग्रेस पक्षात युती व्‍हावी हे काँग्रेसच्‍या काही पदाधिकाऱ्यांना नको. त्‍यामुळेच ‘आप’चे आमदार असलेल्‍या वेळ्‍ळी आणि बाणावलीत काँग्रेसने शक्‍तीप्रदर्शनाचा प्रयत्‍न केला.

एकप्रकारे ‘आप’ वर कुरघोडीचा हा प्रयत्‍न होता. मागच्‍या बाणावलीच्‍या जिल्‍हा पंचायत पोटनिवडणुकीच्‍यावेळी ‘आप’ आणि काँग्रेस यांची युती असल्‍याचे सांगितले गेले, तरी आतून काँग्रेस नेत्‍यांनी ‘आप’च्‍या उमेदवाराच्‍या विरोधातच काम केले, असा आरोप त्‍यांनी केला.

ही मुलाखत ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी घेतली असून ही मुलाखत ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या फेसबुक, यू-ट्यूब आणि इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे.

गोव्‍यात ‘आप’ला विस्‍तार करायचा आहे, त्‍यामुळे जिल्‍हा पंचायत निवडणुकीत बहुतेक सर्व ठिकाणी पक्ष उमेदवार उभा करेल. यापूर्वीही आम्‍ही गाेव्‍यात निवडणुका लढविलेल्‍या आहेत. सध्‍याच्या स्‍थितीत किमान १५ मतदारसंघात ‘आप’ची चांगली स्‍थिती आहे. इतर मतदारसंघातही ‘आप’ची स्थिती भक्‍कम करू, असे ते म्‍हणाले.

येथे पहा सविस्तर मुलाखत

कॉंग्रेसने त्यांचे आमदार फुटणार नाहीत, हे पहावे!

वेळ्‍ळी मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला तरीही ‘आप’ला त्‍याचा फारसा मोठा धोका असणार नाही. कारण काँग्रेसने आमदार परत परत फुटत असल्‍याने लोकांचा नाही म्‍हटला तरी काँग्रेसवरील विश्‍वास उडाला आहे.

अशा परिस्‍थितीत ‘आप’चे दोन्‍ही आमदार पक्षाबराेबर स्‍थिरपणे उभे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. काँग्रेसला युती हवी असेल तर त्‍यांनी आपल्‍या पक्षात आधी सफाई केली पाहिजे आणि निवडून येणारे आमदार फुटून जाणार नाहीत, याचा विश्‍वास लोकांमध्‍ये निर्माण करण्‍याची गरज आहे, असे सिल्‍वा म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT